मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कलाकार मंडळींबद्दल भाष्य करायचं झालं तर अगदी हमखास घेतली जाणारी काही मोजकी नाव आहेत. या नावांपैकी काही नाव म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करत विनोदाचं तुफान टायमिंग साधत या कलाकारांनी विनोदाचा एक नवीन दर्जा निर्माण केला. निवेदिता व लक्ष्मीकांत यांचं बॉण्डिंगही खूप चांगलं आहे. (Nivedita Saraf On Laxmikant Berde)
आज लक्ष्मीकांत आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे हे आजही लोकांच्या मनावर राज्य करतात. त्यांनी एकेकाळी फक्त मराठी नाही तर हिंदी सिनेसृष्टीलाही वेड लावले. लक्ष्मीकांत यांनी चंदेरी दुनियेसह रंगभूमीचे मंचदेखील गाजवले. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांचा लेक अभिनय बेर्डे हादेखील मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमठवत आहे.
अभिनय बेर्डेने काही वर्षांपूर्वीच मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं. सध्या त्याच ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक सुरु आहे. ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून अभिनय रंगभूमी गाजवताना दिसत आहे. नुकतंच हे नाटक निवेदिता सराफ यांनीही पाहिलं. निवेदिता यांनी नाटक पाहिल्यानंतर एक खास पोस्ट शेअर केली. यावेळी त्यांनी अभिनयबरोबरचा फोटोही शेअर केला आहे. आणि पोस्टमधून अभिनयच्या अभिनयाचं कौतुक करत लक्षाची आठवण काढली. त्यांनी शेअर केलेली पोस्ट लक्षवेधी ठरत आहे.
निवेदिता यांनी पोस्ट शेअर करत, “नुकताच आज्जीबाई जोरात हे नाटक बघायचा योग आला. नाटक खूप छान आहे. निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर या सगळ्यांनी खूप उत्तम काम केली आहेत. लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनचं खूप कौतुक पण सगळ्यात सुखद धक्का बसला. अभिनय बेर्डेचं काम बघून अप्रतिम काम केलं. त्याने माझ्या बालमित्राची आमच्या लक्षाची खूप आठवण आली. त्याला खूप अभिमान वाटला असता नक्कीच”, असं म्हणत त्यांनी अभिनयचं कौतुक केलं आहे.