गेले काही दिवास युट्यूबवर एका मराठी सिरीजची जोरदार चर्चा सुरु आहे आणि ही सीरिज म्हणजे ‘आठवी-अ’. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे दाखवण्यात आली. या सीरिजचे आतापर्यंत पंचवीस भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सीरिजच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद मिळाला. या सीरिजने गेले अनेक दिवस प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. त्यामुळे या सीरजमध्ये येणाऱ्या अनेक ट्विस्ट्स व रंजक वळणांमुळे या सीरिजच्या प्रत्येक भागासाठी प्रेक्षक आतुर असायचे आणि आज ही आतुरता अखेर संपली आहे.
या सीरिजमध्ये डोंगरावरच्या छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या अभिजीत व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट सांगण्यात आली आहे. आपण ‘आठवी-अ’ मध्ये का नाही? आमच्यात काय कमी आहे? सगळ्यांना समान वागणूक का नाही? आपल्यात होणारा बदल नेमका काय आहे? प्रेम म्हणजे काय? मैत्री म्हणजे काय? असे बरेच प्रश्न बालवयात पडत असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगणारी सीरिज म्हणजे ‘आठवी अ’ ही सीरिज.
आणखी वाचा – अधिपतीच्या घरामधून पैसे चोरीला, भूवनेश्वरीनेच केला होता प्लॅन, अक्षरा चोराला पकडणार का?
‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे चाहत्यांमध्ये सध्या नाराजीचा सुर आहे. अनेकजण ही सीरिज संपल्यामुळे दु:ख व्यक्त करत आहेत. अनेकांनी हे सीरिज संपू नये अशा प्रतिक्रियादेखील व्यक्त करत आहेत. मात्र प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच. त्यामुळे या सीरिजने अखेर आज सर्वांचा निरोप घेतला आहे. ही सीरिज संपली असली तरी आणखी एका नवीन सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. ‘आठवी-अ’ संपताच इट्स मज्जाने आपल्या नवीन वेबसीरिजची घोषणा करण्यात आली आहे आणि ही नवीन सीरिज म्हणजे ‘दहावी-अ’.
आठवी-अ’च्या भरघोस यशानंतर आता इट्स मज्जा आणि मीडिया वन सोल्यूशन्स आणखी एक नवीन कोरी वेबसिरीज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या नवीन सीरिजमध्ये प्रेक्षकांना नवीन काय पाहायला मिळणार? या सीरिजमधून आता आणखी कोणती नवीन कथा दिसणार? ही नवीन सीरिज कधी प्रदर्शित होणार? हे सगळे प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे.