‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपालीने शेखरच्या प्रतिबिंबाचा वापर करुन नेत्रा व इंद्राणी यांच्याकडून अस्तिकट्यार मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रुपालीचा हा प्रयत्न फसला. तसेच विरोचकाच्या या प्रतिबिंब शक्तीबद्दल नेत्रा व इंद्राणी यांच्यासह सर्व कुटुंबियांना शक्तीबद्दल कळलं आहे. अशातच आजच्या भागात फाल्गुनी नेत्राला जे सरबत दिले होते ते खरंतर फाल्गुनी दिले नसून ते विरोचकाने तयार केलेले सरबत होते. त्यामुळे नेत्रा त्या सरबतमुळे काही झाले नाही ना हे तपासण्यासाठी डॉक्टरकडे जाते.
यानंतर रुपाली नेत्राच्या खोलीत येऊन तिला तिच्या बाळाविषयी भीती घालते. विरोचक तुझ्या बाळाला या जगात येऊ देणारच नाही असं म्हणत ती नेत्राच्या पोटाला हात लावणार इतक्यात अद्वैत तिथे येऊन रुपालीचा हात धरुन तिला बाजूला सारतो आणि नेत्राच्या जवळ न येण्याबद्दल दम देतो. त्यानंतर ते दोघे नेत्राच्या बाळाची तपासणी करायला जातात. तेव्हा नेत्राच्या तपासणी केलेल्या रिपोर्ट्समध्ये त्यांना काहीतरी वेगळेच सापडते.
आणखी वाचा – तंटा नाय तर घंटा नाय! ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित, रितेश देशमुख कल्ला करायला सज्ज
नेत्राच्या बाळाच्या रिपोर्ट्समध्ये नखाने काहीतरी खूण केले असल्याचे जाणवते. यामुळे ही खूण कोणी केली या विचारात त्व बाहेर येतात. तेव्हा अद्वैत तिला काहीही चिंता न करण्याचा धीर देतो. इकडे घरात सर्वजण विरोचकाच्या शक्तीविरुद्ध कसं लढणारव्हा विचार करत असताना खरा माणूस कोण आणि प्रतिबिंब कोण हे जाणून घेण्यासाठी ‘मी काय म्हणतो?’ या सांकेतिक शब्दाचा वापर करण्याचा ते विचार करतात.
आणखी वाचा – कर्क व कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस लाभदायक, नोकरी-व्यवसायात होणार लाभ, जाणून घ्या…
यामुळे एकीकडे आता राजाध्यक्ष कुटुंबीय विरोचकाच्या प्रतिबिंब शक्तीविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि दुसरीकडे देवीआई नेत्राच्या बाळाला वाचवण्यासाठी नेत्राच्या हाकेला धावली आहे. देवीआईने एका आजीच्या रुपात येऊन नेत्राची ओटी भरली आहे. तसेच या ओटीत तिने नेत्राला विरोचकाचे चिन्ह असलेले एक कापडही दिले आहे. त्यामुळे आता देवीआईच्या लेकींना देवीआईने नक्की कसले संकेत दिले आहेत. हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.