अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या खूप चर्चेत आली आहे. तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर ती लग्नबंधनात अडकणार आहे. २३ जून रोजी ती लग्नबंधनात अडकणार असून लग्नापूर्वीच्या विधीना सुरुवात झाली आहे. नुकतेच तिच्या मेहंदी समारंभाचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तिची मित्रमंडळी व घरचे काही सदस्य दिसून येत आहेत. यामध्ये मेहंदीसाठी सोनाक्षीने लाल व पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केले होता. जहीरने लाल रंगाचा प्रिंटेड कुर्ता परिक्षाण केला होता. मात्र हे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांचे लक्ष एका गोष्टीने वेधून घेतले आहे. (sonakshi sinha mehndi ceremony)
गेल्या अनेक दिवसांपासून सोनाक्षीच्या लग्नाच्या बातम्या समोर येताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली होती. १९ तारखेपासून दोघांच्याही लग्नाच्या विधीना सुरवात झाली. समारंभाचे काही फोटो देखील समोर आले मात्र यामध्ये सोनाक्षीचे दोघेही भाऊ गैरहजर असलेले दिसले. सोनाक्षीच्या लग्नामुळे लव व कुश हे खुश नसल्याचे अंदाज बांधले जात आहेत.

सोनाक्षीचे लग्न ठरल्यापासून तिच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध आहे असे अनेकदा बोलले गेले. मात्र काही दिवसांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा व आई हे सोनाक्षीच्या घरी ठेवलेल्या पार्टीमध्ये एकत्रित धमाल करताना दिसून आले. यामध्ये शत्रुघ्न यांचे जावई जहीरबरोबर असेलेल खास नातेदेखील पाहायला मिळाले. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
मात्र समारंभांच्या सुरुवातीपासूनच सोनाक्षीचे दोन्ही भाऊ गैरहजर दिसले आहेत. त्यामुळे बहिणीच्या नात्याला दोघांचीही अनुमती नसल्याचे अंदाज नेटकऱ्यांनी बांधले आहेत. यावर अद्याप कुटुंबीयांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सत्य नेमके काय आहे हे लवकरच सर्वांच्या समोर येईल.
दरम्यान, सोनाक्षी व जहीरक यांचे लग्न २३ जून रोजी मुंबई येथील एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये होणार आहे. यावेळी दोघंही कोर्ट मॅरेज करणार असून लग्नासाठी मित्रपरिवार व कुटुंबाव्यतिरिक्त काही कलाकारदेखील समाविष्ट होणार आहेत.