रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’मधील सायलीकडे खऱ्या आयुष्यात आहे पिस्तूल, अभिनेत्रीला जीवे मारण्याची दिलेली धमकी, म्हणाली, “माझ्याबरोबर सहा महिने…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 22, 2024 | 5:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharla Tar Mag fame actress Jui Gadkari talked about why she carry a pistol know more

'ठरलं तर मग'मधील सायलीकडे खऱ्या आयुष्यात आहे पिस्तूल, अभिनेत्रीला जीवे मारण्याची दिलेली धमकी, म्हणाली, "माझ्याबरोबर सहा महिने…"

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. सध्या ती ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती सायली हे पात्र साकारत असून ईची हीभूमिका अनेकांच्या पसंतीस उतरत आहे, आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचं प्रचंड मोठा चाहतावर्गही आहे.

जुई ही गेली अनेक वर्ष टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असली तरी तिने खडतर प्रवास करत तिचे आताचे स्थान प्राप्त केलं आहे. जुई याआधी अनेक कारणांनी चर्चेत आली आहे. याआधी तिने अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. अशातच जुईने नुकत्याच ‘कॉकटेल स्टुडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत तिला एकदा जीवे मारण्याची धमकीही आली होती. याबद्दल सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’च्या अर्जुनने सांगितली त्याच्या खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी, बायकोला I Love You ही म्हटला नाही अन्…; म्हणाला, “माझी पत्नी…”

या मुलाखतीत जुईला तुझ्यावर पिस्तूल बाळगण्याची वेळ कशी आली? असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत जुईने असं म्हटलं की, “२०१४ला माझ्या वाढदिवशी मला जीवे मारण्याची धमकी आली होती. माझ्या कर्जतच्या घरावर काही पत्रं आली होती. ज्यात आम्ही २१ जुलैला जुईला मारुन टाकू होतं असं  लिहिलं होतं. पण माझा स्वभाव बघता मी तेव्हा काही घाबरले नव्हते. त्यादरम्यान ठाणे पोलिस स्टेशनचे एसीपी लक्ष्मीनारायण सर यांनी मला तू एक अभिनेत्री आहेस त्यामुळे तुला अनेक ठिकाणी जावं लागतं. तर तू पिस्तूलसाठी अर्ज कर असं सांगितलं. त्यानंतर लगेच पांच दिवसांत मला पिस्तूल मिळालं”.

आणखी वाचा – “मला रंग, उंची आवाजावरुन हिणवण्यात आले अन्…”, जुई गडकरीचा इंडस्ट्रीत काम करण्यावरुन मोठा खुलासा, म्हणाली, “काळी आली असं बोलले…”

पुढे ती असं म्हणाली की, “तेव्हा अशी परिस्थिती होती की, माझ्याबरोबर सहा महिने शस्त्र असलेले बॉडीगार्ड्स होते. कारण कधीही काहीही होईल अशी परिस्थिती होती. तर त्यांच्या हातातली शस्त्र मी पाहत होते. मी तेव्हा पिस्तूल वापरण्याच्या सगळ्या पद्धती शिकून घेतल्या. त्या परिस्थितीत मला माझे कुटुंब व प्रसाद मित्राने खूप खंबीर साथ दिली आणि पोलिसांनीही मला ते जवळ बाळगायला सांगितले होते. त्यामुळे मला एक आत्मविश्वास आला पण त्याचबरोबर एक जबाबदारीही आली”.      

Tags: jui gadkarimarathi actressmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
sonakshi sinha religon change

लग्नानंतर धर्म बदलणार नाही सोनाक्षी सिन्हा, होणाऱ्या सासऱ्यांनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले, "हिंदू किंवा मुसलमान…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.