‘बिग बॉस’ ओटीटीचे तिसऱ्या पर्वाचा भव्य प्रीमियर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या नवीन पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते.मात्र यावेळी नवीन पर्वाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी सलमान खानकडे नसून अनिल कपूर यांच्यावर आहे. त्यांनी प्रीमियर लॉच झाल्यानंतर सहभागी सदस्यांची ओळख करुन दिली आणि त्यांच्याबरोबर बोलणेदेखील करुन दिले. ‘बिग बॉस’ ओटीटीच्या तिसऱ्या पर्वात १६ सदस्य सहभागी झाले आहेत. या शोमध्ये टेलिव्हिजन, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर,पत्रकार, खेळ, ससंगीत व साहित्य या सर्व क्षेत्रातील दिग्गज सहभागी आहेत. (Sana Makbul Khan accident)
पहिल्याच एपिसोडमध्ये सदस्यांची ओळख करुन देण्यात आली तसेच त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभवदेखील शेअर केले आहेत. अभिनेत्री सना मकबुलने एक खुलासा केला आहे. ज्यामुळे प्रत्येक जण हैराण झाला आहे. यामध्ये पहिल्या दिवशी सना व पॉलोमी दास यांच्या मते बोलणं झालं. दोघींमध्ये आरोग्यविषयक बोलणं सुरु होतं. त्यावेळी सनाच्या ओठावर एक निशाण दिसले. त्यावेळी पॉलोमीने हे काय झालं असं विचारलं.
त्यावर सनाने सांगितलं की, “एका कुत्र्याने माझ्या ओठांचा चावा घेतला होता. पॉलोमीला खूप आश्चर्य वाटले आणि म्हणाली की, “तुझ्याबरोबर इतकं सगळं झालंय असा तुझा चेहरा बघून कोणीही बोलणार नाही”. त्यावर सना म्हणाली की, “माझ्या चेहऱ्यामुळे मी कमवत आहे आणि माझ्याबरोबर जो प्रसंग घडला त्यामुळे मला चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. या घटनेनंतर तिला नैराश्यदेखील आले होते”.
याआधी ‘खतरो के खिलाडी’ या कार्यक्रमामध्येही तिने याबद्दलचा खुलासा केला होता. ती म्हणाली होती की, “२०२० साली लोकडाऊनमध्ये कुत्र्याने चेहऱ्याचा चावा घेतला होता. त्यामुळे स्कीन फाटली होती. यामुळे प्लॅस्टिक सर्जरी व ग्राफ्टिग अशा अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या”.
अजूनही तिच्यावर उपचार सुरु असून परिस्थिति बदलली आहे. मात्र तिच्यासाठी हा वाईट अनुभव असल्याचेही तिने सांगितले. या प्रकारानंतर तिच्या मनात प्राण्यांबद्दल भीती निर्माण झाल्याचेही ती म्हणाली.