आपण सगळे आपल्या किंवा आपल्या पालकांच्या एखाद्या स्वप्नासाठी नेहमी धडपडत असतो. बरेच जण लहानपणीच एखाद स्वप्न उरी बाळगतात आणि त्या दिशेने आपली पाऊल टाकायला सुरुवात करतात आणि ज्या दिवशी हे स्वप्न सत्यात उतरत त्यावेळचा आनंद काही वेगळाच असतो.(Ashvnini Mahangade Post)
पहा अश्विनीला या अभिनेत्यासोबत करायचंय एकत्र काम (Ashvnini Mahangade Post)
सामान्य माणूस असो अथवा कलाकार स्वप्न पाहणं आणि ती पूर्ण करण हा सगळ्यांचं उद्देश असतो. मराठी मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्रीच देखील असच एक स्वप्न पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय ती अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. विविध मालिका, चित्रपट यांच्या माध्यमातून घराघरात पोचलेली अभिनेत्री अश्विनी हीचं अभिनेता अंकुश चौधरी या कलाकारासोबत चित्रपटामध्ये काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात अश्विनी आणि अंकुश एकत्र काम करताना दिसणार आहेत. अंकुश सोबत फोटो पोस्ट करत तिने ही माहिती दिली आहे. इंस्टाग्राम वर केलेल्या पोस्ट मध्ये तिने लिहिले आहे ‘ कॉलेज संपवून कला क्षेत्रात काम मिळावे म्हणून मुंबईला आले तेव्हा माझ्या आत्याने माझा प्रेमाने, मायेने सांभाळ केला. त्यावेळी कधीतरी बोलताना आत्याने विचारले की कोणत्या हिरो सोबत काम करणार तू? आणि क्षणाचाही विलंब न करता सहज बोलले की अंकुश चौधरी. बहुतेक तेव्हा देवी लक्ष्मी “तथास्तु” म्हणाली असावी. हिरो……. अंकुश चौधरी. कलाकार म्हणून उत्तम काम करता यायला हवं. एवढी एक इच्छा माझी माझ्याकडून कायम असते.(Ashvnini Mahangade Post)
हे देखील वाचा – ‘बाजीराव ची मस्तानी’ शिवानीच्या फोटोंची रंगली चर्चा…
अश्विनी सध्या आई कुठे काय करते या मालिकेत काम करताना दिसते तर आगामी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात देखील ती दिसणार आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या ऐतिहासिक, लोकप्रिय मालिकेत अश्विनीने साकारलेली राणूसाहेब ही शिवकन्येची भुमिका देखील प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात राहिली आहे.
