बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमी चर्चेत असते. बेधडक विधाने व स्पष्टवक्तेपणा यामुळे ती अनेकदा चर्चेत आली आहे. आजपर्यंत तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अनेकदा तिने साकारलेल्या भूमिकांवरुन तिला ट्रोलही करण्यात आले. मात्र या सगळ्याकडे तिने दुर्लक्ष करत तिने आपले काम सुरु ठेवले. अशातच तिने एका मुसलमान व्यक्तीबरोबर लग्न केल्यानेही ती चर्चेत आली होती. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ईद साजरी केल्याने तिला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केले होते. हे नक्की प्रकरण काय आहे? हे समजून घेऊया. (swara bhaskar on food blogger)
बकरी ईदच्या दिवशी एका फूड ब्लॉगरबरोबर स्वराची शाब्दिक चकमक पहायला मिळाली. फूड ब्लॉगरने स्वतः शाकाहारी असण्याचा गर्व असल्याचे सांगितले. त्यानंतर पती फहाद अहमद व मुलगी राबिया रमा अहमद यांच्याबरोबर बकरी ईद साजरी करणाऱ्या स्वराचा पारा मात्र चढला. त्यानंतर स्वराने मात्र खडे बोल सुनावले आहेत.
Honestly… I don’t understand this smug self righteousness of vegetarians. Your entire diet is made up of denying the calf its mother’s milk.. forcibly impregnating cows then separating them from their babies & stealing their milk. You eat root vegetables? That kills the whole… https://t.co/PqHmXwwBTR
— Swara Bhasker (@ReallySwara) June 16, 2024
स्वराने एका फूड ब्लॉगरला ट्विटमधून उत्तर दिले आहे. फूड ब्लॉगरने आपल्या ट्विटमध्ये पनीर व भाताचा फोटो शेअर करत लिहिले की, “मला मी शाकाहारी असण्यावर गर्व आहे. माझ्या ताटात अश्रु, क्रूरता व अपराध यांचा अंश नाही”. हे शेअर करत स्वराने शाकाहारी खाणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
स्वराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “खरं सांगू…तर शाकाहारी लोक हे स्वतःला इतकं कसं योग्य समजू शकतात. त्यांचे पूर्ण जेवण हे वासराच्या वाटणीचं दूध घेऊन, तसेच गाईला जबरदस्ती गर्भवती ठेऊन आणि त्या वासराला आईपासून वेगळं केलं जातं तेव्हा यांना दूध मिळतं. तसेच मुळं असणारी भाजी खाल्ली जाते. यामध्ये तर संपूर्ण झाडांची हत्या होत असते. जरा शांती ठेवा. आज बकरी ईद आहे म्हणून असं काही बोलू नका”.
स्वराने २०२३ साली फहाद अहमदबरोबर लग्नबंधनात अडकली. तिने जेव्हा लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर लगेचच २३ सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. मुलीचं नाव राबीया असे ठेवण्यात आले.