शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अप्पी आधी दिसायची अशी, अगदी साधा होता लूक, अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 18, 2024 | 7:02 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
appi amchi collecter

'अप्पी आमची कलेक्टर'मधील अप्पी आधी दिसायची अशी, अगदी साधा होता लूक, अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका सुरु असून या मालिकेत आलेल्या रंजक कथानकातील ट्विस्टने ही मालिका साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेने सात वर्षांचा लीप घेतलेला मालिकेत पाहायला मिळत आहे. अर्जुन व अप्पी यांच्यातील दुरावा लवकरच संपणार असल्याचं मालिकेत पहायला मिळत आहे. शिवाय अमोलसाठी हे दोघेही एकत्र येणार आहेत. (Appi Amchi Collector shivani naik)

मालिकेत अप्पी हे पात्र अभिनेत्री शिवानी नाईक साकारत आहे. शिवानीने अप्पी या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मालिकाविश्वात पदार्पण करण्याआधी शिवानीने अनेक नाटक व एकांकिकेमधून अभिनयाची आवड जोपासली. या मालिकेआधी शिवानीने स्क्रीनवर कुठेही काम केलेलं नाही आहे. वा कोणत्याही मालिकेत लहान-भूमिकाही साकारलेल्या नाहीत. शिवानीने रंगभूमीवरुन अभिनयाची सुरुवात केली आहे. शिवानीने नाटकांमध्ये काम केलं आहे आणि नाटक हे तिचं पहिलं प्रेम आहे.

आणखी वाचा – ‘तुला शिकवीन…’मधील अक्षराचं असं आहे सासरकडचं घर, सासूबाईंबरोबर मिळून केली घराची सजावट, स्वच्छतेने वेधलं लक्ष, Inside Video समोर

View this post on Instagram

A post shared by Shivani Naik (@shivaninaikofficial)

सोशल मीडियावरही शिवानी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन अनेक फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. मालिकेत येण्यापूर्वी शिवानी नेमकी कशी दिसायची याची झलक या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. अत्यंत साधी राहणीमान असलेल्या या शिवानीचे फोटोही साधे आहेत. कोणताच मेकओव्हर न करताही शिवानी अत्यंत सुंदर व साधीभोळी होती. या फोटोंमध्ये तिचे थोडेफार ग्लॅमरस अंदाजातील फोटोही लक्ष वेधून घेत आहेत.

आणखी वाचा – सहा महिन्यांची झाली सई लोकूरची लेक, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “मला तुझी आई म्हणून…”

View this post on Instagram

A post shared by Shivani Naik (@shivaninaikofficial)

सध्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत शिवानी कलेक्टर ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहे. कमी वेळात प्रसिद्ध झालेल्या या मालिकेतून अप्पी हे पात्र घराघरांत पोहोचलं. खेडेगावातून आलेल्या एका गरीब कुटुंबातील मुलीचा संघर्षमय प्रवास या मालिकेत पाहायला मिळत आहे. आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक अडचणींवर मात करुन कलेक्टर होण्याची जिद्द अप्पीने पार करत कथानकाला वजनदार केले. शिवानीने साकारलेल्या या मालिकेला प्रेक्षक भरभरुन पसंती देत आहेत आणि तिचं कौतुकही करत आहेत.

Tags: appi amchi collecterAppi Amchi Collector shivani naikentertainmentmarathi actressshivani naik
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
19 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष, वृषभ व सिंह राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस धनलाभाचा, व्यवसाय व नोकरीत होणार बरकत, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.