शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गाईला जबरदस्ती गर्भवती ठेऊन तुम्ही…”, ईदच्या दिवशी मांसाहारी न खाण्यावरुन सल्ला देणाऱ्यांवर भडकली स्वरा भास्कर, म्हणाली, “शाकाहारी लोक…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 19, 2024 | 1:03 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
swara bhaskar on food blogger

"गाईला जबरदस्ती गर्भवती ठेऊन तुम्ही…", ईदच्या दिवशी मांसाहारी न खाण्यावरुन सल्ला देणाऱ्यांवर भडकली स्वरा भास्कर, म्हणाली, "शाकाहारी लोक…"

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमी चर्चेत असते. बेधडक विधाने व स्पष्टवक्तेपणा यामुळे ती अनेकदा चर्चेत आली आहे. आजपर्यंत तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अनेकदा तिने साकारलेल्या भूमिकांवरुन तिला ट्रोलही करण्यात आले. मात्र या सगळ्याकडे तिने दुर्लक्ष करत तिने आपले काम सुरु ठेवले. अशातच तिने एका मुसलमान व्यक्तीबरोबर लग्न केल्यानेही ती चर्चेत आली होती. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ईद साजरी केल्याने तिला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केले होते. हे नक्की प्रकरण काय आहे? हे समजून घेऊया. (swara bhaskar on food blogger)

बकरी ईदच्या दिवशी एका फूड ब्लॉगरबरोबर स्वराची शाब्दिक चकमक पहायला मिळाली. फूड ब्लॉगरने स्वतः शाकाहारी असण्याचा गर्व असल्याचे सांगितले. त्यानंतर पती फहाद अहमद व मुलगी राबिया रमा अहमद यांच्याबरोबर बकरी ईद साजरी करणाऱ्या स्वराचा पारा मात्र चढला. त्यानंतर स्वराने मात्र खडे बोल सुनावले आहेत.

आणखी वाचा – ‘तुला शिकवीन…’मधील अक्षराचं असं आहे सासरकडचं घर, सासूबाईंबरोबर मिळून केली घराची सजावट, स्वच्छतेने वेधलं लक्ष, Inside Video समोर

Honestly… I don’t understand this smug self righteousness of vegetarians. Your entire diet is made up of denying the calf its mother’s milk.. forcibly impregnating cows then separating them from their babies & stealing their milk. You eat root vegetables? That kills the whole… https://t.co/PqHmXwwBTR

— Swara Bhasker (@ReallySwara) June 16, 2024

स्वराने एका फूड ब्लॉगरला ट्विटमधून उत्तर दिले आहे. फूड ब्लॉगरने आपल्या ट्विटमध्ये पनीर व भाताचा फोटो शेअर करत लिहिले की, “मला मी शाकाहारी असण्यावर गर्व आहे. माझ्या ताटात अश्रु, क्रूरता व अपराध यांचा अंश नाही”. हे शेअर करत स्वराने शाकाहारी खाणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.   

आणखी वाचा – सहा महिन्यांची झाली सई लोकूरची लेक, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “मला तुझी आई म्हणून…”

स्वराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “खरं सांगू…तर शाकाहारी लोक हे स्वतःला इतकं कसं योग्य समजू शकतात. त्यांचे पूर्ण जेवण हे वासराच्या वाटणीचं दूध घेऊन, तसेच गाईला जबरदस्ती गर्भवती ठेऊन आणि त्या वासराला आईपासून वेगळं केलं जातं तेव्हा यांना दूध मिळतं. तसेच मुळं असणारी भाजी खाल्ली जाते. यामध्ये तर संपूर्ण झाडांची हत्या होत असते. जरा शांती ठेवा. आज बकरी ईद आहे म्हणून असं काही बोलू नका”.  

स्वराने २०२३ साली फहाद अहमदबरोबर लग्नबंधनात अडकली. तिने जेव्हा लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर लगेचच २३ सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. मुलीचं नाव राबीया असे ठेवण्यात आले.

Tags: nonvegpostswara bhaskar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
appi amchi collecter

'अप्पी आमची कलेक्टर'मधील अप्पी आधी दिसायची अशी, अगदी साधा होता लूक, अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.