‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागाच्या रुपाली त्या वीणेच्या आवाजाच्या शोधात घराच्या बाहेर निघाली आहे आणि ती वीणा असलेल्या ठिकाणी पोहोचून वीणा वाजवू लागते. वीणाची तार तुटलेली असतानादेखील रुपाली वीणा वाजवते. तिच्या वीणा वाजवण्यामुळे मात्र नेत्रा, अद्वैत व इंद्राणी यांना इकडे धक्के बसत आहेत. त्यांच्या पायाखालची जमीनीला हादरे बसत आहेत. त्यानंतर अचानक वीणाचा आवाज ऐकू येणे बंद होते. रुपाली वीणा वाजवत असतानादेखील त्यातून आवाज येत नसल्यामुळे विरोचक पुन्हा चिंतेत पडतो.
विचित्र वीणा वाजत नसल्यामुळे रुपाली आक्रोश करत आहे. तसेच तिला शक्ती हवी असल्यामुळे ती जोरजोरात ओरडते. इतक्यात वीणामधून प्रकाश येतो आणि त्यावर एक श्लोक लिहिलेला असतो. हा श्लोक वाचून रुपालीला आनंद होतो. या श्लोकामुळे तिला प्रतिबिंब विद्या प्राप्त झाली असल्याचे कळतं, जी दिवसा काम न् करता फक्त रात्रीच करणार असल्याचे त्या श्लोकावरुन कळते. शिवाय सूक्ष्म काळासाठीच ही विद्या उपयोगी होऊ शकते असं तिला कळतं.
यानंतर इंद्राणी विरोचकला कोणती शक्ती मिळाली हे आपल्याला माहीत नसल्यामुळे विरोचक घरी येताच तिच्यापासून् लांब राहण्याचा सल्ला नेत्राला देते. यावेळी नेत्रा आपण सगळे मिळून विरोचका विरुद्धचे हे युद्ध पार करूया असं म्हणते, इतक्यात रुपाली खूप साऱ्या गोष्टी घेऊन येते. यानंतर फाल्गुनी, तन्मय व केतकी काकू नेत्राच्या बाळासाठी ऑनलाइन कपड्यांची शॉपिंग करत असताना रुपाली त्यांना बघते आणि यामुळे तिला कसलातरी संशय येतो.
नेत्रा गरोदर असल्याचे विरोचकाला कळू नये यासाठी राजाध्यक्ष कुटुंबीय प्रयत्न करताना दिसत आहेत. विरोचकाला नेत्रापासून लांब ठेवण्यासाठी इंद्राणी शेखर व अद्वैत सुरक्षितता पाळत आहेत. मात्र तरीही विरोचकाला नेत्राच्या गरोदरपणाचा संशय आला असल्याचे कळत आहे. त्यामुळे आता रुपालीला जी शक्ती मिळाली आहे, त्या शक्तीचा ती कसा वापर करणार? नेत्रा तिच्या बाळाला विरोचकाच्या शक्तीपासून कसं लांब ठेवणार? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.