मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुपालीला नवीन शक्ती मिळाली, नेत्रा गरोदर असल्याचेही सत्य तिला समजणार, कुणाचा बळी की आणखी काही?

Saurabh Moreby Saurabh More
जून 18, 2024 | 11:04 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulchi Satavi Mulgi serial update new twist Rupali got a new power

रुपालीला मिळाली नवीन शक्ती, नेत्रा गरोदर असल्याचेही सत्य समजणार, कुणाचा बळी की आणखी काही?

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागाच्या रुपाली त्या वीणेच्या आवाजाच्या शोधात घराच्या बाहेर निघाली आहे आणि ती वीणा असलेल्या ठिकाणी पोहोचून वीणा वाजवू लागते. वीणाची तार तुटलेली असतानादेखील रुपाली वीणा वाजवते. तिच्या वीणा वाजवण्यामुळे मात्र नेत्रा, अद्वैत व इंद्राणी यांना इकडे धक्के बसत आहेत. त्यांच्या पायाखालची जमीनीला हादरे बसत आहेत. त्यानंतर अचानक वीणाचा आवाज ऐकू येणे बंद होते. रुपाली वीणा वाजवत असतानादेखील त्यातून आवाज येत नसल्यामुळे विरोचक पुन्हा चिंतेत पडतो.

विचित्र वीणा वाजत नसल्यामुळे रुपाली आक्रोश करत  आहे. तसेच तिला शक्ती हवी असल्यामुळे ती जोरजोरात ओरडते. इतक्यात वीणामधून प्रकाश येतो आणि त्यावर एक श्लोक लिहिलेला असतो. हा श्लोक वाचून रुपालीला आनंद होतो. या श्लोकामुळे तिला प्रतिबिंब विद्या प्राप्त झाली असल्याचे कळतं, जी दिवसा काम न् करता फक्त रात्रीच करणार असल्याचे त्या श्लोकावरुन कळते. शिवाय सूक्ष्म काळासाठीच ही विद्या उपयोगी होऊ शकते असं तिला कळतं.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “एवढा पुळका का?”, ईदच्या शुभेच्छा देताच सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले, “एवढे मराठी सण असताना…”

यानंतर इंद्राणी विरोचकला कोणती शक्ती मिळाली हे आपल्याला माहीत नसल्यामुळे विरोचक घरी येताच तिच्यापासून् लांब राहण्याचा सल्ला नेत्राला देते. यावेळी नेत्रा आपण सगळे मिळून विरोचका विरुद्धचे हे युद्ध पार करूया असं म्हणते, इतक्यात रुपाली खूप साऱ्या गोष्टी घेऊन येते. यानंतर फाल्गुनी, तन्मय व केतकी काकू नेत्राच्या बाळासाठी ऑनलाइन कपड्यांची शॉपिंग करत  असताना रुपाली त्यांना बघते आणि यामुळे तिला कसलातरी संशय येतो.   

आणखी वाचा – अमृता सुभाषच्या मॅनेजरने तिला न विचारताच उचललं चुकीचं पाऊल, बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाला, “भलीमोठी यादी…”

नेत्रा गरोदर असल्याचे विरोचकाला कळू नये यासाठी राजाध्यक्ष कुटुंबीय प्रयत्न करताना दिसत आहेत. विरोचकाला नेत्रापासून लांब ठेवण्यासाठी इंद्राणी शेखर व अद्वैत सुरक्षितता पाळत आहेत. मात्र तरीही विरोचकाला नेत्राच्या गरोदरपणाचा संशय आला असल्याचे कळत आहे. त्यामुळे आता रुपालीला जी शक्ती मिळाली आहे, त्या शक्तीचा ती कसा वापर करणार? नेत्रा तिच्या बाळाला विरोचकाच्या शक्तीपासून कसं लांब ठेवणार? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.   

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya Mulchi Satavi Mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Titeeksha Tawde On Siddharth Bodke

नवऱ्याचा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर, तितीक्षा तावडेचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, "तू माझा अभिमान आहेस आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.