मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एवढा पुळका का?”, ईदच्या शुभेच्छा देताच सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले, “एवढे मराठी सण असताना…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 18, 2024 | 9:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Ruchira Jadhav has been trolled for wishing Eid Mubarak

"एवढा पुळका का?", ईदच्या शुभेच्छा देताच सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले, "एवढे मराठी सण असताना..."

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. मोजक्या तरी लोकप्रिय भूमिका करत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन  केलं आहे. बिग बॉस मराठी नंतर अभिनेत्री आणखीनच प्रसिद्धी झोतात आली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या रुचिराच्या सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत. आपल्या सौंदर्य व अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. रुचिरा तिचे अनेक स्टायलिश व ग्लॅमरस् फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच कालच्या ईदनिमित्त शेअर केलेल्या फोटोमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

कालच्या बकरी ईदनिमित्त रुचिराने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मात्र या फोटोमुळे अभिनेत्री ट्रोलर्सच्या कचाट्यात सापडली आहे. “माझ्या इंटरनॅशनल ट्रॅव्हल शोसाठी बहरीनमध्ये शूटिंग करताना खूप आनंद झाला” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. मी येथे सुंदर बहरीनची झलक शेअर करत असल्याचे तिने सांगितले. बहरीन टूर माझ्या हृदयात कोरली गेली आहे. यातील ही शेवटची पोस्ट  मी शेअर करत असल्याचेही ती म्हणाली. तसेच “या पोषाखामुळे मला मुन्नी असल्याचे वाटत आहे. मुंज्यावाली मुन्नी नव्हे, बदनाम झालेली मुन्नी नव्हे तर जय श्रीराम वाली मुन्नी” असेही तिने पुढे म्हटले.

View this post on Instagram

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

रुचिराने तिचे हे फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काही अवधीतच तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. तिच्या या फोटोखाली एका ट्रोलरने “इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये धर्मो रक्षति रक्षित: लिहायचं आणि इकडे ईदच्या शुभेच्छा द्यायच्या, किती तो विरोधाभास?” असं म्हटलं आहे तर आणखी एकाने “धर्मो रक्षति रक्षित: फक्त बायोमध्ये लिहिण्यासाठी नाही तर त्याचे पालनही केलं पाहिजे” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर आणखी एकाने “इतके मराठी सण आहेत मग ईद मुबारक वगैरे कशाला?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच एकाने “दसरा दिवाळी गुढीपाडवा या सणांच्या दिवशी कोणती मुस्लिम महिला साडी घालून, कुंकू लावून तुम्हाला शुभेच्छा देते का? मग तुम्हाला एवढा पुळका का?” अशी कमेंट केली आहे. या कमेंट्ससह आणखी बऱ्याच कमेंट्स करत नेटकऱ्यांनी रुचिराला ट्रोल केले आहे. त्याचबरोबर तातडीने अनफॉलो करणार असल्याचेही म्हटले आहे.

आणखी वाचा – निर्जला एकादशीमुळे मंगळवारचा दिवस आहे खूपच, तुमच्या सर्व इच्छा व मनोकामना होतील पूर्ण, जाणून घ्या…

दरम्यान, या पोस्टखाली अनेक नकारात्मकत कमेंट्स येताच अभिनेत्रीनेही तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “कमेंट्समध्ये लोकांची नकारात्मकता पाहून मला धक्काच बसला आहे. पण ठीक आहे. मी या फोटोमध्ये कुर्तीव त्यावर डेंनीम असा पोशाख परिधान केला आहे, जो की माझ्या कामाचाच एक भाग आहे. ‘कर्म’ आणि ‘धर्म’ पूर्णपणे समजणाऱ्यांसाठी ही पोस्ट. बाकी तुम्हा सर्वांना काय बोलावे हे मला माहीत नाही”.

आणखी वाचा – अमृता सुभाषच्या मॅनेजरने तिला न विचारताच उचललं चुकीचं पाऊल, बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाला, “भलीमोठी यादी…”

तसेच यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “महाराजांचा उल्लेख करणाऱ्यांना विचारायचं आहे की, त्यांनी कधी दुसऱ्या धर्माचा निरादर करायला शिकवलं आहे का?. माझ्या बायोमधील ‘धर्मो रक्षति रक्षित:’ यावरून प्रश्न विचारणा ऱ्यांना गीतेतला हा श्लोक कळला असता तर तुमची प्रतिक्रिया वेगळी असती. तुमच्या भावनांचा आदर आहेच पण याचा अर्थ तुमचे विचार नेहमीच योग्य असतात असं नाही”

Tags: marathi actressmarathi entertainment newsRuchira Jadhav
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Paaru Serial Update

अ‍ॅडशूटचं सत्य अहिल्यादेवींसमोर येणार, दिशा-दामिनीची नवी चाल, पारू-आदित्यला होणार का कठोर शिक्षा?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.