बॉलीवूड शहनशाह म्हणून अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले जाते. १९६९ साली त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासस सुरुवात केली. चित्रपट कारकिर्दीला सुरवात केल्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट अयशस्वीदेखील झाले. मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अपयशाला मागे टाकत चित्रपटसृष्टीमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. वयाच्या ८१व्या वर्षीही ते काम करताना दिसतात. अभिनयाबरोबरच ते सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ब्लॉगच्या माध्यमातून ते चाहत्यांबरोबर सतत काही ना काही शेअर करत असतात. अशातच त्यांच्या घरातील काही फोटो समोर आले आहेत. (amitabh bachchan house mandir )
अमिताभ यांनी आजपर्यंत त्यांच्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘जलसा’ बंगल्यातील भव्य मंदिराची झलक बघायला मिळत आहे. रविवारी त्यांनी पुन्हा एकदा मंदिराचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी मंदिरात देवांच्या मूर्ती असल्याचेही सांगितले. प्रामुख्याने तिथे असलेल्या शिवलिंगाकडे लक्ष गेले.
बिग बी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते स्वतः मंदिरातील शिव लिंगाची पूजा करताना दिसत आहेत. संगमरवराने तयार केलेल्या मंदिरातील शिवलिंगावर जल अर्पण करताना दिसत आहेत. हे मंदिर किती सुंदर पद्धतीने सजवले गेले हे फोटो पाहिल्यावर लक्षात येते. मंदिराच्या चारही बाजूना झाडे असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसत आहे.
अमिताभ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ते टायगर श्रॉफ व कृती सेनन यांच्या ‘गणपथ’ या चित्रपटामध्ये दिसून आले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. आता त्यांचा ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्याबरोबर प्रभास, दीपिका पडूकोण व दिशा पाटनी यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करणार असून हा चित्रपट २७ जून २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.