‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपालीने राजाध्यक्षांच्या घरात प्रवेश केल्यानंतर ती विरोचक नसून रुपालीसारखे वागत असल्याने सर्वांनाच चिंता लागून राहिली आहे, अशातच नेत्राला विरोचकापासून कुटुंबियांना काही धोका निर्माण होणार नाही ना? याची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे त्याने घरच्यांना काही करु नये यासाठी नेत्रा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी अद्वैत नेत्राला विरोचकापासून काहीही कुणालाच काही धोका नसल्याचे सांगतो. तेव्हा नेत्राही विरोचकाला त्याच्याच जाळ्यात अडकवण्याचे सांगते. यावेळी नेत्रा अद्वैतला असं म्हणते की आपण हे मान्य करुयात की, विरोचक हा विरोचक नसून ती रुपाली राजाध्यक्षच आहे असं समजून तिला गाफील ठेवायचं आणि मग तिच्याकडून अस्तिकट्यार मिळवायची.
यापुढे शेखर इंद्राणीकडे नेत्राच्याअ बाळाची काळजी व्यक्त करतात, विरोचकाने जे फाल्गुनीबरोबर केले तेच त्याने नेत्राबरोबर करु नये यासाठी त्या दोघांना विरोचकापासून लांब ठेवण्याविषयी सांगतात. त्यामुळे इंद्राणीने नेत्राला हे सांगावं की तिने इथून कुठे तरी लांब जावे, असं सांगण्याची विनंती करतात. यावेळी इंद्राणी नऊ महिने नेत्राला घरापासून लांब ठेवणे शक्य नसल्याचे सांगते. त्यानंतर रुपालीदेखील कट्यार नष्ट होईपर्यंत मला हे असंच वागावं लागेल असं म्हणत असते.
यापुढे नेत्राला घरातल्या सर्वांना विरोचकाच्या मनाप्रमाणे सर्वांनी वागावे असं म्हणते. कारण त्याला अशीच माणसे आवडतात. विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर विरोचकही विश्वास ठेवतो. यामुळे विरोचक घरात राहील आणि त्यामुळे अस्तिकट्टयार मिळू शकेल असं म्हणते. त्यानंतर रुपाली अस्तिकट्यारच्याअ शोधात जाते. आणि ती अस्तिकट्यार रुपाली जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करते. मात्र तिच्याकडून ते साध्य होत नाही.
आणखी वाचा – “ही मुलगी डोक्यात जाते”, मायरा वायकुळच्या व्हिडीओवर नको नको त्या कमेंट, खरंच ट्रोल करणाऱ्यांना हे शोभतं का?
त्यामुळे आता पुढील भागात विरोचकाने अस्तिकट्यार नष्ट केली आहे की नाही. हे पाहायला मिळणार असून विरोचक घराच्या बाहेर जाऊन काहीतरी करत असल्याची शंका नेत्रा व इंद्राणीच्य लेकींना आली आहे. त्यामुळे नेत्रा व इंद्राणी रुपालीचा खरा चेहरा ओळखणार का? की त्याच्याच जाळ्यात अडकणार हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.