सध्या सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये सध्या एका गाण्याची खूपच चर्चा होताना पाहायला मिळत आहे आणि ते गाणं म्हणजे ‘पुष्पा-२’ या चित्रपटामधील ‘अंगारो सा सामी’. हे गाणं.सध्या सोशल मीडियावर हे गाणं ट्रेंड होत असून हा ट्रेंड अनेकजण फॉलोदेखील करत आहेत. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी या गाण्यावर डान्स व्हिडीओ करत आहेत. अशातच ‘पारू’ या लोकप्रिय मालिकेतील पारू, दिशा व आदित्य म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनवणे, पूर्वा शिंदे व अभिनेता प्रसाद जवादे यांनीही या लोकप्रिय गाण्यावर डान्स व्हिडीओ शेअर केला होता.
मालिकेच्या सेटवरच या कलाकारांनी ‘अंगारो सा सामी’ या गाण्यावर हटके डान्स व्हिडीओ केला आहे. ‘पारू’ मालिकेचे शुटींग हे सातारामध्ये सुरू असून या मालिकेचा सेट हा भव्यदिव्य आहे. या सेटवर किर्लोस्करांच्या घरासमोर मोठी बाग आहे आणि बागेतच शरयू, पूर्वा व प्रसाद यांनी हा डान्स केला आहे. या गाण्यातील हुकस्टेप्सवर हटके डान्स करत त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता आणि अवघ्या काही तासांतच या गाण्याला चांगलाच प्रतिसादही मिळाला होता.

‘पुष्पा-२’मधील ‘अंगारो सा सामी’ या लोकप्रिय गाण्यात दाक्षिणात्य व बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना व सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या व्हिडीओला चाहत्यांसह अनेक कलाकरांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे तुफान प्रतिसाद दिला आहे. मात्र या व्हिडीओखालील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधू घेतले आहे. या गाण्यात डान्स करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने या गाण्यावर कमेंट करत ‘पारू’मधील कलाकारांच्या डान्सला दाद दिली आहे.
आणखी वाचा – मिथुन, सिंह राशीसह ‘या’ राशीच्या लोकांसाठी शुक्रवार आहे फारच खास, उत्पन्न वाढेल व बढतीही मिळेल, जाणून घ्या…
श्वेता शिंदेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रश्मिकाची ही कमेंट मेन्शन केली असून याबद्दल तिने आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, शरयू, पूर्वा व प्रसाद जवादे यांच्या पारू मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांची ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.