टेलिव्हिजनवर ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाने सगळ्यांनाच वेड लावले. टेलिव्हिजनवर अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. टीव्हीवर या कार्यक्रमाला यश मिळाल्यानंतर हा कार्यक्रम ओटीटीवर सुरु करण्यात आला. सध्या ओटीटीवर या कार्यक्रमाचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन यावेळी सलमान खान करणार नसून अनिल कपूर करताना दिसणार आहे. आता यामध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची अंदाजित नावे समोर आले आहेत. त्यामुळे यावेळचे पर्व खूप चर्चेत राहणार आहे. (big boss ott 3)
या वेळच्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाची आता लोक आतुरतेने वाट बघत आहेत. यावेळी बिग बॉसच्या घरात यावेळी कृती सेननची बहीण नूपुर सेनन, फरहान अख्तरची मेव्हणी अनुषा दांडेकर, तनुश्री दत्ता, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा उष्मेय चक्रवर्ती, हेमा मालिनीची मुलगी अहाना देओल, संजय दत्तची मुलगी त्रिशला दत्त व ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मधील भव्य गांधीदेखील दिसून येऊ शकतो. तसेच या शोमध्ये नक्की काय काय पाहायला मिळणार आहे? त्याबद्दलही आपण जाणून घेऊया.
‘इटाइम्स’च्या रिपोर्ट्सनुसार, या पर्वामध्ये खोट्या फॅन फॉलोइंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी सब्स्क्रीप्शन प्लॅन आणले आहेत. यासाठी पीआर सपोर्टदेखील काढून घेतला आहे. या कार्यक्रमामध्ये आधी नूपुर सेनन व अनुषा दांडेकर यांचे नाव आधीपासूनच चर्चेत होते. पण आता सूत्रांनी सांगितले की, “आम्ही तनुश्री, अहाना, त्रिशाला, भव्य तसेच इतर कलाकारांबरोबर बोलणे सुरु आहे”. पण त्याबद्दल अधिकृत माहिती समोर आली नाही”.
तसेच सूत्रांनी पुढे सांगितले की, “यावेळी सब्स्क्रीप्शन असल्याने यावेळी हा शो अधिक मोठा होऊ शकतो. हे सर्व पैसे कामावण्यासाठी नसून खोटी फॅन फॉलोइंग कमी करणे हे आहे”. यावेळी सोशल मीडियावरील पेज साठी पैसे देता येणार नाहीत. यावेळी कार्यक्रमाची वेगळ्या पद्धतीने आखणी करण्यात आली असून प्रेक्षकदेखील खूप एंजॉय करु शकणार आहेत.