निपुण धर्माधिकारी हा फक्त अभिनेता नसून एक दिग्दर्शक आणि उत्तम लेखक सुद्धा आहे. निपुण चा चेहरा भाडीपा या युट्युब चॅनल मुळे प्रेक्षकांच्या ओळखीचा झाला. निपुणने मी वसंतराव या चित्रपटातचे लेखन तसेच दिग्दर्शन देखील केले आहे. या चित्रपटाला सात पुरस्कार देखील मिळाले आहेत. या व्यतिरिक्त निपुण त्याच्या सोशल मीडियावर सुद्धा बराच सक्रिय असतो. नुकताच निपुने त्याची पत्नी संहिता हिचा गाणं गातानाचा एक व्हिडियो इंस्टाग्रामवर पोस्ट केलंय. आणि हा व्हिडियो आता चांगलाच चर्चेमध्ये आलाय. (Sanhita Nipun Dharmadhikari)
या व्हिडियोमध्ये संहिता मन का पापिहरा.. हे गाणं गाताना दिसते आहे. हे गाणं गात असताना संहिता विहा म्हणजेच तिच्या मुलीला घास भरवत आहे. विहा सुद्धा आई जवळ जाऊन तिचे लाड करताना दिसते आहे. निपुणने या व्हिडियोला ओ सजना..असे कॅप्शन दिले आहे.

हे देखील वाचा: वैदेहीच्या फोटोवरील आकाश ठोसरची कमेंट ठरतेय लक्षवेधी
या व्हिडिओवर चाहत्यांसोबतच अभिनेत्री मोसली सेन म्हणजेच प्राजक्ता कोळी तसेच अभिनेता रोहित सराफ या कलाकारांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. निपुण ने प्राजक्ता आणि रोहित या कलाकारांसोबत मिळून मिस्टमॅच नावाची वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. (Sanhita Nipun Dharmadhikari)
हे देखील वाचा: तितिक्षा आणि ऐश्वर्याची पडद्यामागची धमाल
निपुणने याआधी बापमाणूस नावाच्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. परंतु निपुणच्या मी वसंतराव या सिनेमाला जास्तीचे यश मिळाले या सिनेमात वसंतरावांची भूमिका राहुल देशपांडे यांनी साकारली होती. हा सिनेमा राहुल देशपांडे यांच्या आजोबांचा जीवनपट आहे. हा चित्रपट दिग्दर्शित करताना निपुण धर्माधिकारीने खूप मेहनत घेतली होती. हा सिनेमा प्रदर्शित झाल्या नंतर निपुणची प्रेक्षकांनी तसेच अनेक दिग्गज मंडळींनी त्याची स्तुती केली.