रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाबा झाल्यानंतर वरुण धवनची पहिली पोस्ट, अभिनेत्याच्या वडिलांना आजोबा झाल्यानंतर काय करावं हेही सुचेना, म्हणाला, “आमचं मुल…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 4, 2024 | 12:41 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
varun dhawan first baby

बाबा झाल्यानंतर वरुण धवनची पहिली पोस्ट, अभिनेत्याच्या वडिलांना आजोबा झाल्यानंतर काय करावं हेही सुचेना, म्हणाला, "आमचं मुल…"

‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून अभिनेता वरुण धवन हा अधिक प्रकाशझोतात आला. वरुणने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. बदलापुर, बवाल, भेडिया, मै तेरा हिरो, कलंक अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. पण तो त्याच्या चित्रपटांबरोबरच खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी वरुण व त्याची पत्नी नताशा यांनी मुलाला जन्म देणार असल्याचे जाहीर केले होते. अशातच आता ३ जून रोजी वरुणला कन्यारत्न प्राप्त झाले असल्याचे वरुणचे वडील डेव्हिड धवन यांनी सांगितले. त्यानंतर पहिल्यांदाच वरुणने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. ( varun dhawan first baby)

वरुण व नताशा यांना मुलगी झाली असल्याचे आजोबा डेव्हिड यांनी माध्यमांना सांगितले. त्यानंतर डेव्हिड व वरुण माध्यमांच्या समोर आले होते. त्यावेळी वरुणच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसत होता. त्याने आता आपला आनंद चाहत्याबरोबर शेअर केला आहे. मुलीच्या येण्याच्या आनंदात वरुणने पोस्टमध्ये लिहिले की, “आमचे मूल या जगात आले आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छासाठी खूप खूप धन्यवाद. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे”.

आणखी वाचा – अखेर अक्षराने अधिपतीला म्हटलं आय लव्ह यु, दोघांमध्ये बहरणार प्रेम, पण भुवनेश्वरी नवा डाव खेळणार का?

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

दरम्यान ही पोस्ट व्हायरल होताच त्याच्या चाहत्यांनी व अनेक कलाकारांनी नवीन पाहुणीच्या आगमनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या क्युट व्हिडीओचं कौतुकदेखील केले जात आहे. दरम्यान ३ जून रोजी वरुणला हिंदुजा रुग्णालयाबाहेर पाहिले गेले. त्यावेली त्यांचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वरुण हा वडिलांबरोबर चालताना दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्यांनी वरुणला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्याने माध्यमांना अभिवादन केले.

आणखी वाचा – सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य कल्पनासमोर?, नातवंडांचं स्वप्न राहणार का अपूर्ण?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या वर्षांच्या सुरवातीलाच फेब्रुवारी महिन्यात वरुण व नताशा यांनी आई-वडील होणार असल्याची घोषणा केली होती. नताशाच्या पोटाला किस करतानाचा फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “आम्ही प्रेग्नट आहोत. तुमच्या आशिर्वाद व प्रेमाची गरज आहे”. या पोस्टलाही प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली होती.  

Tags: baby borndevid dhawanNatasha Dalalvarun dhawan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेला दत्तगुरुंचं वेड, माणगांवमध्ये दत्तमंदिरात भजन गात असताना भाविकांचीही तुफान गर्दी, कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.