मराठी सिनेसृष्टीत रिल जोड्या प्रमाणेच रियल लाईफ जोड्या देखील प्रेक्षकांचं मन जिंकतात. या रिअल लाईफ जोड्यांची तर सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगते .त्यांचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. तर अश्यातच कायम चर्चेत असणारी जोडी म्हणजे शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी. (Virajas Kulkarni Shivani Rangole)
पहा विराजसची लग्नानंतरची खास पोस्ट (Virajas Kulkarni Shivani Rangole)
सोशल मीडियावर नेहमीच त्यांची हवा पाहायला मिळते. शिवानीच्या हटके अदा आणि विराजसच अनोखं कॅप्शन ही त्यांची ओळख आहे. उत्तम अभिनयासोबत ही जोडी सोशल मीडियावर देखील सक्रिय असून चाहत्यांच मनोरंजन करते. तर अश्यातच विराजसच्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

विराजसने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत विराजस आणि शिवानी पाहायला मिळतायत. विराजसने या व्हिडिओमध्ये खऱ्या आयुष्यातील लग्न आणि टेलिव्हिजन वर दाखवण्यात होणार लग्न यांच्या दुहेरी कल्पना मांडल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ प्रत्येकाच्या आयुष्याच्या जवळचा असल्याने विराजसने या व्हिडिओला ‘घरोघरी मातीच्या चुली’ असं कॅप्शन दिल आहे. रील लाईफ मध्ये दाखवण्यात येणार लग्नानंतरच जीवन ही गुडी गुडी दाखवत असलं तरी खऱ्या आयुष्यातील तडजोड कोणाला चुकली नाही आहे, याच वर्णन विराजस आणि शिवानीने व्हिडिओमध्ये केलं आहे.
हे देखील वाचा – या अभिनेत्रीला ओळखलंत का ?रेशीमगाठ मालिकेत साकारलीय खलनायिका
झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून विराजसने सिनेविश्वात पदार्पण केल होतं. अल्पावधीतच विराजस घराघरात लोकप्रिय झाला. युवा पिढीचा खास करून तरुणींच्या गळ्यातील ताईतही तो अल्पावधीत झाला. विराजस हा उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय तो लेखक आणि दिग्दर्शक ही आहे. प्रायोगिक नाट्य क्षेत्रातही विराजस अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. (Virajas Kulkarni Shivani Rangole)

तर शिवानी देखील उत्तम अभिनेत्री आहे. तिनं अनेक मालिकांमधून काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मलिकरून सध्या ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. शिवानीनं आपल्या कसदार अभिनयाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
