‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. या रहस्यमय मालिकेतील गूढ उलगडताना पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरत आहे. मालिकेत तितीक्षा तावडे व अजिंक्य ननावरे ही कलाकार मंडळी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. तर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ही खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेच्या कथानकामुळे आणि मालिकेतील कलाकारांमुळे ही मालिका अधिक लोकप्रिय झाली आहे. (Aishwarya Narkar On Trolling)
ऐश्वर्या नारकर या मालिकेशिवाय सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. ट्रेंडिंग रील व्हिडीओ त्या नेहमीच चाहत्यांसह सोशल मीडियावरुन शेअर देखील करतात. या ट्रेंडिंग रीलवरून बरेचदा ऐश्वर्या नारकर यांना ट्रोलही केलं गेलं आहे. दरम्यान त्यांनी या ट्रोलिंगवर वेळोवेळी उत्तर दिलेलं पाहायला मिळालं. ऐश्वर्या ट्रोलर्सला न जुमानता नेहमीच त्यांना उत्तर देताना दिसतात.
अशातच ऐश्वर्या व तितीक्षा यांचा एक रील व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमद्ये दोघीही तयार होताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दोघेही मेकअप करताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांचा पारंपरिक अंदाज साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शविलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान एका नेटकऱ्याने व्हिडीओवर केलेल्या खोचक कमेंटला ऐश्वर्या नारकरांनी सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे.

ऐश्वर्या व तितीक्षा यांच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने, “थोडंसं शेण लावा ना. छान दिसेल”, अशी कमेंट केली आहे. यावर उत्तर देत ऐश्वर्या यांनी त्या नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं आहे. ऐश्वर्या यांनी या नेटकऱ्यांची कमेंट स्टोरीमध्ये पोस्ट करत, “तुम्ही रोज लावता का?”, असा प्रश्न विचारला आहे. ऐश्वर्या यांना त्यांच्या चाहत्यांनी सपोर्ट करत त्या नेटकऱ्याला चांगलंच सुनावलेलं पाहायला मिळत आहे.