मालिकांच्या माध्यमातून कलाकार घरोघरी पोहोचतात. दररोज एका मोठया काळापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं मालिका हे मोठं साधन आहे. आणि याच मालिकाविश्वातून आपलं नाव करणारी अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर. आपल्या अभिनय कौशल्याने समृद्धीने तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहील याची कायमच काळजी घेतली आहे.(Samruddhi Kelkar)
समृद्धी अभिनयासोबतच प्रोफेशनल डान्सर देखील आहे.ढोलकीच्या तालावर या डान्स शो मध्ये टॉप फाईव्ह स्पर्धकांपैकी ती एक होती, त्या नंतर ती कलर्स मराठी वरील लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. यात तिने लक्ष्मी हे पात्र साकारलं होत. या मालिकेत ओमप्रकश आणि सुरभी हे देखील मुख्य भूमिकेत होते. आणि स्टार प्रवाह वरील फुलाला सुंगंध मातीचा या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. या मालिकेत ती कीर्ती ही मुख्य भूमिका करत होती हर्षद अतकरी हा त्या मालिकेचा नायक होता.तिच्या या भूमिकेसाठी तिला स्टार प्रवाह चे पुरस्कार देखील मिळाले आहेत.
पहा समृद्धीचा मोहक अंदाज
तसेच समृद्धी तिच्या सोशलमीडिया वर ही बरीच ऍक्टिव्ह असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून ती बरेच फोटोज आणि रिल्स शेअर करते. तिच्या प्रत्येक पोस्टला प्रेक्षक भरभरून दाद देतात. सध्या तिने हॅशटॅग माय हॅपी प्लेस असे कॅप्शन देत समुद्रकिनाऱ्यावरती ट्रेंडिग गाण्यावरचा एक रील पोस्ट केला आहे त्यात तिने ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनच स्कर्ट टॉप घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या रील मध्ये तिच्या मनोहक अदाकारीमुळे ती फारच सुंदर दिसतेय.तिच्या या रील वर प्रेक्षकांनी लाईक आणि कमेंट्स चा वर्षाव केलाय. तर अभिनेत्री गिरिजाप्रभू हिने देखील रेड हार्ट ची कमेंट केलेली पाहायला मिळतेय. (Samruddhi Kelkar)
मालिकांन व्यतिरिक्त सध्या समृद्धी मी होणार सुपरस्टार या रिऍलिटी शो मध्ये निवेदन करताना दिसते. या बरोबरच तिची दोन कटिंग हि शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. यात समृद्धी सोबत अक्षय केळकर मुख्य भूमिकेत आहे, ही जोडी देखील प्रेक्षकांना आवडली. म्हणूनच या शॉर्ट फिल्म चे २ सीजन देखील आले आणि काहीच दिवसान पूर्वी या शॉर्ट फिल्म चा तिसरा भाग देखील लवकरच येणार असल्याची बातमी समृद्धीने शेअर केली आहे.तिसऱ्या सीजन मध्ये समृद्धी आणि अक्षय सोबत बिग बॉस फेम अमृता देशमुख देखील पहायला मिळणार आहे.