छोट्या पडद्यावरील मालिकेचा प्रेक्षकवर्ग हा मालिकेच्या कथानकाबद्दल चोखंदल असतो. मालिके घडणाऱ्या कथानकाशी रिलेट करतो. त्यामुळे मालिकेतील व मालिकेच्या कथानकाबद्दल प्रत्येक प्रेक्षक आपली प्रतिक्रिया देत असतो. अशीच एक मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कारण अप्पी व अर्जुन दोघेही आता वेगवेगळ्या वाटेवर प्रवास करणार आहेत. मालिकेने लीप घेतला असून मालिकेच्या या नवीन वळणाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत मिळत आहे.
मात्र मालिकेत आता अर्जुन व आर्या यांच्या लग्नाचे कथानक सुरु आहे. सात वर्षांपूर्वी अप्पी व अर्जुन यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अशातच आता या दोघांच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती येऊ पाहत आहे. अर्जुनबरोबर असणारी त्याची मैत्रीण आर्या ही अर्जुनच्या प्रेमात पडली असून तिने अर्जुनविषयीच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावरील एक प्रोमो समोर आला असून यात त्यांच्या दोघांच्या नात्याबद्दल अर्जुन व अप्पीच्या वाडिलांमध्ये संवाद होतानचे पाहायला मिळत आहे. मात्र यावर प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “बापापासून मुलाला लांब करून काय दाखवायचा आहे? त्या मूर्ख रुपालीला मालिकेमधून काढून टाका”, तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “साईराजमुळे मालिकेला रंग आला, पण आता मालिकेचा वीट आला आहे. मालिका मुळात अप्पी व अर्जुनवर आहे आणि त्यांना वेगळे करायचे असेल तर मालिकेने निरोप घ्यावा” तर दुसऱ्याने “कलेक्टरच्या पोस्टला काही महत्त्व आहे की नाही?” अशी कमेंट केली आहे.

तर अनेकांनी या मालिकेतील अर्जुनची वहिनी रुपालीबद्दल रोष व्यक्त केला असल्याचे पाहायला मिळत आहे. “रुपालीचं जरा जास्तच चाललं आहे, रुपाली खूपच ओव्हरअॅक्टींग करत आहे, रुपालीला या मालिकेतून काढून टाका” अशा अनेक कमेंट्स करत या मालिकेच्या सध्याच्या कथानकाबद्दल नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.