छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. त्यापैकी एक म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. रसिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. रसिकाने आजवर अनेक मराठी मालिकांमधून अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन् केले आहे. त्याचबरोबर तिने काही चित्रपटातूनही तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे.
अशातच अभिनेत्रीची आता थेट बॉलिवूड चित्रपटामध्ये वर्णी लागली आहे. मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा ‘मुंज्या’ हा एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटात रसिका वेंगुर्लेकरची ही महत्त्वाची भूमिका आसल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या ट्रेलरमधून रसिकाची झलक पाहायला मिळत आहे. रसिकाने तिच्या सोशल मीडियाद्वारे ती या चित्रपटाचा भाग असल्याच्या निमित्ताने आनंद व्यक्त केला आहे.

रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे व त्याखाली असं म्हटलं आहे की, “या चित्रपटाचा ट्रेलर खूपच छान झाला आहे. मी या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. तसेच या चित्रपटाचा एक छोटासा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे.” रसिकाबरोबरच या चित्रपटात सुहास जोशी व भाग्यश्री लिमये, शर्वरी वाघ यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे या अभिनेत्रींना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खुपच उत्सुक आहेत.
दरम्यान, रसिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने तिने ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फ्रेशर्स’ व ‘देवयानी’ या मालिकेतून् प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर तिने काही हिंदी मालिकांमधून अभिनय केला आहे. अशातच तिच्या या नवीन हिंदी चित्रपटासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत हे नक्की.