बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

३० वर्षांनंतर घडला इतिहास, छाया कदम यांचा चित्रपट पाहून उपस्थित उभं राहून टाळ्या वाजवू लागले अन्…; Cannesमध्ये नेमकं काय घडलं?

Saurabh Moreby Saurabh More
मे 25, 2024 | 1:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chhaya Kadam's film received a standing ovation at Cannes Film Festival video viral on social media.

३० वर्षांनंतर घडला इतिहास, छाया कदम यांचा चित्रपट पाहून उपस्थित उभं राहून टाळ्या वाजवू लागले अन्...; Cannesमध्ये नेमकं काय घडलं?

कान्स फिल्म फेस्टिव्हलचं ग्लॅमर हे दरवर्षी पाहायला मिळतं. कला आणि फॅशनने सजलेल्या या मंचावर चित्रपटांचा गौरव केला जातो. अशातच यंदाच्या कान्स महोत्सवात भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तब्बल तीन दशकांनंतर एका भारतीय चित्रपटाला कान्स महोत्सवात नामांकन मिळाले आहे. ‘All We Imagine As Light’ या भारतीय चित्रपटाला कान्समध्ये नामांकन मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीत पाल्मे डी’ओर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

या चित्रपटात छाया कदम यांची प्रमुख भूमिका आहे. छाया कदम यांनी आजवर ‘फॅंड्री’, ‘सैराट’, ‘न्युड’, ‘रेडू’, ‘सरला एक कोटी’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांसह ‘झुंड’ व ‘गंगूबाई काठियावाडी’ अशा बॉलीवूड चित्रपटांत अभिनय केला आहे. सध्या त्यांच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अशातच त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे त्यांचं पुन्हा एकदा कौतुक होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “वयाचं भान ठेऊन काही उपयोग नाही”, नवऱ्यासह डान्स करण्यावरुन बोलणाऱ्यांची ऐश्वर्या नारकरांनी केली बोलती बंद, म्हणाल्या, “हवं तसं जगणं…”

छाया कदम यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या ‘All We Imagine As Light’ या चित्रपटातील भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. छाया कदम यांच्या ‘All We Imagine As Light’ या चित्रपटाचा कान्स चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला आणि या चित्रपटाचा प्रीमियर संपल्यानंतर उपस्थितांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी अभिनेत्रीचे कौतुक केले. यावेळी उपस्थितांच्या कौतुकाने छाया कदम खूपच भारावलेल्या दिसत आहेत. विशेष म्हणजे तब्बल तीन दशकांनंतर भारतीय चित्रपट कान्समध्ये दाखल झाला आहे.   

आणखी वाचा – मालिकेमधून ब्रेक घेत पाचगणीत नवऱ्यासह फिरायला गेल्या ऐश्वर्या नारकर, निसर्गरम्य वातावरणात नारकर कपलची धमाल, सुंदर व्हिडीओ समोर

दरम्यान, ‘All We Imagine As Light’ या भारतीय चित्रपटाला कान्समध्ये नामांकन मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीत पाल्मे डी’ओर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. ‘All We Imagine As Light’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडिया यांनी केले आहे. तर या चित्रपटात कनी कुसरुती, छाया कदम, दिव्या प्रभा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.    

Tags: chhaya kadammarathi actressmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Hardik Pandya Controversial Statement

"माझे अनेक महिलांशी संबंध अन्…", हार्दिक पांड्याने करण जोहरच्या शोमध्ये केलेलं धक्कादायक वक्तव्य, म्हणालेला, "मुलींना मॅसेज पाठवून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.