शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री, ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
मे 25, 2024 | 8:58 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Maharashtrachi hasyajatra fame Rasika Vengurlekar seen in the Munjya bollywood movie.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री, ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. त्यापैकी एक म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. रसिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. रसिकाने आजवर अनेक मराठी मालिकांमधून अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन् केले आहे. त्याचबरोबर तिने काही चित्रपटातूनही तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

अशातच अभिनेत्रीची आता थेट बॉलिवूड चित्रपटामध्ये वर्णी लागली आहे. मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा ‘मुंज्या’ हा एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटात रसिका वेंगुर्लेकरची ही महत्त्वाची भूमिका आसल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या ट्रेलरमधून रसिकाची झलक पाहायला मिळत आहे. रसिकाने तिच्या सोशल मीडियाद्वारे ती या चित्रपटाचा भाग असल्याच्या निमित्ताने आनंद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये लीला-ऐजेच्या नात्यात गोंधळ, तर दुसरीकडे मालिकेत नव्या अभिनेत्याची एन्ट्री, कथेला नवं वळण

रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे व त्याखाली असं म्हटलं आहे की, “या चित्रपटाचा ट्रेलर खूपच छान झाला आहे. मी या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. तसेच या चित्रपटाचा एक छोटासा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे.” रसिकाबरोबरच या चित्रपटात सुहास जोशी व भाग्यश्री लिमये, शर्वरी वाघ यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे या अभिनेत्रींना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खुपच उत्सुक आहेत.

आणखी वाचा – ३० वर्षांनंतर घडला इतिहास, छाया कदम यांचा चित्रपट पाहून उपस्थित उभं राहून टाळ्या वाजवू लागले अन्…; Cannesमध्ये नेमकं काय घडलं?

दरम्यान, रसिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने तिने ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फ्रेशर्स’ व ‘देवयानी’ या मालिकेतून् प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर तिने काही हिंदी मालिकांमधून अभिनय केला आहे. अशातच तिच्या या नवीन हिंदी चित्रपटासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत हे नक्की.  

Tags: maharashtrachi hasyajatramarathi entertainment newsRasika Vengurlekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
25 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

शनिवारी कुंभ राशीच्या लोकांची नोकरीत होणार बढती, तर सिंह राशीच्या लोकांनाही मिळणार व्यवसायात नफा, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.