मराठी तसेच हिंदी मालिका विश्वातून नाव कमावत नावारूपाला आलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही तिच्या मोहक अदांनी चाहत्यांना भुरळ घालत असते. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत तिने साकारलेली नेहा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. या मालिकेने चारशे पेक्षा अधिक भाग पूर्ण केल्यानंतर प्रेक्षकांचा निरोप घेतला. याशिवाय प्रार्थना सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे देखील चर्चेत असते. प्रार्थनाने केलेल्या प्रत्येक फोटोशूटला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो. प्रार्थना तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशलमिडीयावर नेहमीच शेअर करत असते. परंतु प्रार्थनाच्या या फोटोने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले आहे. नेहमी ग्लॅमर्स लूकमध्ये दिसणाऱ्या प्रार्थनाने नुकताच तिचा नो मेकअप लुकमधला एक फोटो शेअर केला आहे. (Prarthana Behere New Photo)

प्रार्थनाने या फोटोला ” No makeup No filter day ” असे कॅप्शन दिले आहे. प्रार्थनाच्या या फोटोवर तिच्या एका चाहत्याने “निसर्ग सौंदर्य कोणत्याही प्रकारची गरज नसते” असं म्हटलंय. तर काहींनी प्रार्थनाच्या फोटोवर हार्ट इमोजी देखील पाठवल्या आहेत. परंतु या सगळ्यांमध्ये प्रार्थनाच्या फोटोवर तिचा सहकलाकार श्रेयस तळपदेने तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे. श्रेयसच्या ” Maidammmmm ” या कमेंटने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. श्रेयसच्या या कमेंटला प्रार्थनाने “Sirrrr” असा रिप्लाय दिला आहे. प्रार्थना आणि श्रेयसने एकत्र माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत काम केले असल्यामुळे, ते एकमेकांशी चांगला बॉण्ड शेअर करताना दिसतात.
हे देखील वाचा: म्हणून दादांनी लिहिलं ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…..’
प्रार्थना दिग्दर्शक संजय जाधव तसेच कुशल बद्रिके, संजय नार्वेकर आणि अभिनय बेर्डे यांच्यासोबत लंडनला शूटिंग मध्ये व्यस्थ असल्याचं पाहायला मिळते. प्रार्थना सोबतच हे सर्व कलाकार शूटिंगचा आनंद घेत लंडन मध्ये मज्जा देखील करताना दिसतायत. याचबरोबर हे सगळे जण मिळून हॅशटॅग “दादा के जलवे” नावाने फनी रील त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करताना पाहायला मिळतायत. (Prarthana Behere New Photo)
याच प्रमाणे श्रेयस आपल्याला झी चित्र गौरव पुरस्कार २०२३ आणि “दादा साहेब फाळके अवॉर्ड २०२३” हे दोन्ही पुरस्काराचे निवेदन करताना पाहायला मिळाला होता.