झी मराठी वर नव्याने आलेली पारू ही मलिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. गावाकडील अल्लड पारूचा रंजक प्रवास या मालिकेत पाहायला मिळत आहे. तर अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या करारीपणाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अशातच मालिकेत पारू व आदित्य यांच्यात फुलत जाणारं प्रेमही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
सध्या मालिकेत सूर्यकांत कदम व अहिल्यादेवी यांच्यातील वाद पाहायला मिळत आहे. अशातच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समोर आलेला प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. या प्रोमोमध्ये पारू व आदित्य यांच्यातील प्रेमाची चाहूल पाहायला मिळत आहे. सदर प्रोमो हा किर्लोस्कर कंपनीच्या ब्रँडसाठी शूट केला असल्याचं समोर आलं आहे. पण या प्रोमोमध्ये पारू तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्यासाठी नकार देत आहे.
मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्यादेखील चांगलाच पसंतीस पडताना दिसत आहे. मालिकेत आदित्य व पारू यांची जोसडी प्रेक्षकांना आवडत आहे. त्यामुळे त्यांचे लग्न व्हावे अशीही काही चाहत्यांची इच्छा आहे. त्यामुळे या प्रोमोखाली प्रेक्षकांनी आपली त्यांची ही इच्छा व्यक्त केली आहे. या प्रोमोखाली मालिकेच्या प्रेक्षकांनी “किती गोड दिसत आहेत दोघे. एका क्षणासाठी खरंच वाटलं पण हे तर खोटं लग्न आहे”, “अप्रतिम पारू-आदित्य ही खूप चांगली जोडी आहे”, “दोघेही एकत्र खूप छान दिसत आहेत” अशा अनेक कमेंट्स करत या प्रोमोला प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – सासूबाईंचं हृता दुर्गुळेवर आहे जीवापाड प्रेम, सून व लेकाचा रोमॅंटिक व्हिडीओ पाहून म्हणाल्या, “तुम्ही दोघं…”
दरम्यान, या प्रोमोमध्ये पारू व आदित्य यांच्या शाही विवाहसोहळा संपन्न होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रँडच्या शूटसाठी दोघेही वधू-वराच्या रूपात तयार झालेले दिसत आहेत. यांत पारूचा पारंपरिक लूक लक्ष वेधून घेत आहे आकर्षक दागिने, नऊवारी साडीमध्ये पारू खूपच सुंदर दिसत आहे. पण अचानक पारू तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेण्याला नकार देत आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.