मराठी मालिकाविश्वामधील प्रसिद्ध अभिनेते शंतनू मोघे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेनंतर शंतनू यांना खूप प्रसिद्धी मिळाली. शंतनू आता “सफरचंद” या नाटकात काम करत आहेत. शंतनू यांना एका नाटकाच्या तालमीमध्ये काम करत असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर काही दिवसांनी लगेचच “सफरचंद” या नाटकाचा प्रयोग होता. या नाटकात शंतनू यांनी व्हॉकर हातात घेऊन प्रयोग पूर्ण केला आहे. या संदर्भाची पोस्ट त्यांची पत्नी अभिनेत्री प्रिया मराठेनी तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Shantanu Moghe Drama)

काय म्हणाली प्रिया…
या पोस्ट मध्ये प्रियाने शंतनू यांचे प्रयोगादरम्यानचे फोटोज तसेच व्हिडियो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये “Real hero! Hatts off वगैरे अलंकार फार छोटे वाटत आहेत..हे तूच करू जाणे..तुला आणि तुझ्यातल्या कलाकाराला सलाम! ज्यांना कल्पना नाही त्यांना सांगू इच्छिते.. पाय fracture झालेला असताना, वॉकर घेऊन, ठरलेला प्रयोग अतिशय उत्तम प्रकारे करून शांतनू नी खरंच अभूतपूर्व उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे..कमाल! आता तुला हडाचा कलाकार म्हणता येईल असं प्रियाने कॅप्शन मध्ये म्हंटल आहे.
हे देखील वाचा: “काय करू ह्यांचं”तुषारने शेअर केला भाऊंचा धमाल व्हिडिओ
तिच्या या व्हिडियोवर अनेक चाहत्यांनी शंतनू यांचे कौतुक केले आहे. तसेच “स्वराज्य रक्षक संभाजी” या मालिकेतील त्यांचे सहकलाकार अमोल कोल्हे यांनी सुद्धा प्रियाच्या या पोस्टवर “हॅट्स ऑफ टू डेडिकेशन ऑफ दिस मॅन शंतनुमोघें गेट वेल सून” अशी कमेंट करत शंतनू यांना लवकर बरे व्हा असे सांगितले आहे. तर तुम्हाला प्रियाने शेअर केलेली ही पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. (Shantanu Moghe Drama)

शंतनू यांचे हे नाटक जम्मू आणि काश्मीर येथील LOC वरील खानपोरा गावात वसलेली ही एक हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे. ही कथा तेथील तरुणांबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल बोलते. मोहम्मद , श्यामलाल, अन्वर आणि झेलम असे चार लोकं, एकमेकांशी पूर्णपणे संबंध नसलेले, एका क्षणी भेटतात आणि अनंतकाळासाठी एकमेकांशी जुडले जातात. या नाटकाची लेखिका स्नेहा देसाई असून या नाटकाचे दिग्दर्शन राजेश जोशी यांनी केले आहे. या नाटकामध्ये शंतनू यांच्या व्यतिरिक्त “प्रमोद शेलार, संजय जमखंडी, अमीर तडवळकर, अक्षय वर्तक, रुपेश खरे, राज आर्यन आणि शर्मिला शिंदे, हे कलाकार भूमिका साकारत आहेत.