तुम्ही सध्या बेरोजगार असेल किंवा तुम्ही एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाते. सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नोकरीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सदर भरतीच्या माध्यमातून नेमकी कोणती आणि किती पदे भरली जाणार आहेत, या नोकरीसाठी अर्ज कुणी करावा, किंवा त्यासाठी शैक्षणिक पात्रता, निवड पद्धती आणि अर्जाची अंतिम तारीख काय आहे? याबद्दल सर्व माहिती तुम्हाला या बातमीमध्ये मिळेल.
या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार नाही. थेट मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या…
- AEE/करार या पदासाठी एकूण तीन पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासाठी ५६,१००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण तीन पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ४४,९००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
- ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण १५ पदांवर भरती करण्यात येणार आहे. तर यासाठी उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर या पदासाठीच्या उमेदवारांसाठी ३५,४००/- रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे.
- ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल या पदासाठी एकूण चार पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी ITI (ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल)/इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ३५,४००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
- डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण दोन पदांवर भरती करण्यात येणार आहे. तर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही ट्रेडमधील मान्यताप्राप्त संस्थेतून ITI शिक्षण असावे. या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ३५,४००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
- तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण १५ पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासाठी २५,५००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
यासाठी पात्र उमेदवारांना एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडजवळ, सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. या नोकरीच्या मुलाखती या ५ जून २०२४ ते २१ जून २०२४ दरम्यान घेण्यात येणार आहेत. ५, १०, १२, १४, १९, २१, २४ या दिवशी मुलाखती होणार आहेत. या नोकरीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.