शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राखी सावंतच्या गर्भाशयामध्ये १० सेमीचा ट्युमर, अभिनेत्रीवर लवकरच मोठी शस्त्रक्रिया, म्हणाली, “मी कधीही हार मानली नाही पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 17, 2024 | 12:42 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
rakhi sawant tumor surgery

राखी सावंतच्या गर्भाशयामध्ये १० सेमीचा ट्युमर, अभिनेत्रीवर लवकरच मोठी शस्त्रक्रिया, म्हणाली, "मी कधीही हार मानली नाही पण…"

गेल्या काही दिवसांत राखी सावंत अधिक चर्चेत आली आहे. सार्वजनिक ठिकाणी ती नेहमी काही ना काही करताना दिसत असते. अशातच आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोन दिवसांपूर्वी अचानक तब्येत खराब झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. तिचे रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. तिच्या तब्येतीवर तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेशने माहिती दिली. आता पुन्हा एकदा तिच्या तब्येतीबाबतची अपडेट समोर आली आहे. (rakhi sawant tumor surgery)

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिचे सर्व चाहते चिंतेत आले होते. तिच्या गर्भाशयात गाठ असल्याचे रितेशने मध्यमांसमोर सांगितले. त्यामुळे तिच्याबद्दलची चिंता अजूनच वाढली. अशातच तिने आता चाहत्यांसाठी स्वतः संदेश देत काळजी करु नये असे सांगितले आहे. तिने सांगितले की, “मी लवकरच बरी होईन. माझी तब्येत ठीक नाही. डॉक्टरांना माझ्या पोटात १० सेंटीमीटरचा ट्यूमर मिळाला आहे. शनिवारी शस्त्रक्रिया होणार आहे. मी आता जास्त काही बोलणार नाही. पण रितेश माझ्या तब्येतीबद्दल माहिती देतच राहील”.

आणखी वाचा – लग्नाचा बाजार! राखी सावंत व तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेश पुन्हा एकत्र, आदिल खानला सुनावलं, त्याच्या बायकोलाही दिला सल्ला

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पुढे ती म्हणाली की, “जेव्हा माझ्यावर शस्त्रक्रिया होईल तेव्हा ट्यूमर मी सगळ्यांना दाखवेन. आता माझे ब्लडप्रेशर व इतर गोष्टी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मी अभिनेत्री आहे डॉक्टर नाही त्यामुळे मला याबद्दल जास्त काही कल्पना नाही”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’नंतर ‘या’ लोकप्रिय कलाकारांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेची घोषणा, प्रोमो समोर

त्यानंतर ती म्हणाली की, “येथील डॉक्टर्स चांगले आहेत. ते त्यांचे काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. मी माझ्या आयुष्यात कधीही हार मानली नाही. लहानपणापासूनच मी संघर्ष पाहिला आहे. मला काहीच होणार नाही हे मला माहीत आहे. माझ्या आईचा आशिर्वाद नेहमी माझ्याबरोबर आहे. हा तर एक छोटासा ट्यूमर आहे. निघूनच जाईल”.

हे सर्व सांगताना राखी खूप भावूक झाली आणि ती रडू लागली. नंतर ती म्हणाली की, “मी परत येऊन नाचेन व गाणेदेखील गाणार. मी लोकांचे मनोरंजन करेन. माझ्या शरीरात गाठ असेल असे मला अजिबात वाटले नव्हते. मी तर टॉवेलमध्ये नाचले होते. जेव्हा मी घरी आले तेव्हा मी बेशुद्ध झाले. रितेश त्याचवेळी मला घेऊन रुग्णालयात पोहोचला. त्यानंतर रिपोर्ट्स आले आणि समजले की ट्यूमर आहे”.

राखीच्या तब्येतीबद्दल सर्वांनाच काळजी लागून राहिली आहे. आता राखी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी समोर येईल याची चाहते वाट पाहत आहेत.

Tags: rakhi sawantsurgerytumor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Video : ...अन् 'ती' बातमी कळताच कार्तिकी गाडकवाडची सासू आनंदाने उड्या मारु लागली, आई झाल्यानंतर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

Video : ...अन् 'ती' बातमी कळताच कार्तिकी गाडकवाडची सासू आनंदाने उड्या मारु लागली, आई झाल्यानंतर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.