छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर आता त्रिनयना देवीच्या मुली हतबल झाल्याचे पाहायला मिळाले होते. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केले आहे. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत असल्याचे आतापर्यंत मालिकेत पाहायला मिळाले.
अशातच मालिकेत नेत्रा व इंद्राणी यांनी रुपालीचा बंदोबस्त करतानाचेही पाहायला मिळाले. रुपाली समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून वश करते. त्यामुळे तिला कुणाशीही संपर्क येणार नाही अशा ठिकाणी कैद करुन ठेवलं आहे. रुपालीच्या या वश करण्याच्या युक्तीबद्दल नेत्रा व इंद्राणी यांना माहिती झाली असून त्यांनी रुपालीच्या डोळ्यांत तिखट मसाला टाकून तिच्या गळ्यात साखळदंड अरकवून तिला एका पेटीत डांबतानाचे पाहायला मिळाले.
अशातच मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला असून यामुळे प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या नवीन प्रोमोमध्ये रुपाली विरोचक विरोचक अशा हाका मारताना दिसत आहे. यानंतर काही नाग येतात आणि रुपालीला बंद करुन ठेवलेल्या पेटीतून ते रुपालीची सुटका करतात. त्यामुळे साखळदंडाने बंद असलेली रुपाली अचानक पेटीतून बाहेर येतानाचे पाहायला मिळत आहे. हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, यामुळे मालिकेच्या कथानकाला आणखी एक नवीन वळण आलं आहे. विरोचकाची सुटका होणे हे नेत्रा-इंद्राणीसाठी आव्हान असणार आहे. त्यामुळे आता विरोचकाची सुटका नेत्रासाठी कोणतं नवीन वादळ घेऊन येणार आहे? विरोचकाच्या परतण्याने आता नेत्रा-इंद्राणी कसं लढणार? हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे