हास्य जत्रा कार्यक्रमाच्या पसंती बदल वेगळं बोलायला नको. हास्यजत्रेचा चाहता वर्ग मोठा आहे. दमदार लिखाण कलाकारांचं विनोदाचं टाईमिंग याने, शो ला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. हास्यजत्रेने त्यातील कलाकारांना घराघरांत पोहचवलं आहे. हास्यमहारथी म्हणून आज ज्याची ओळख आहे तो म्हणजे समीर चौघुले. अनेक नवनवीन स्किट घेऊन समीर आपल्या समोर येत असतो. (Samir Choughule Fan Moment)
पहा काय म्हणालाय समीर चा फॅन (Samir Choughule Fan Moment)
त्याची अनेक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहतात, त्यापैकीच एक पात्र म्हणजे लोचन मजनू. त्याच्या या पत्राने तर वेगळाच हास्यधुमाकूळ घातलाय. त्यांचे हे स्किटस सोशलमीडिया वर देखील ट्रेंडिंग असतात. प्रेक्षक कमेंट्स, लाईक्स मधून त्यांचं प्रेम व्यक्त करतातच, पण काही फॅन्स खास असतात.
तू चाल पुढं मालिकेतील कुहू म्हणजेच पिहू गोसावी ने समीर चौघुले च्या लोचन मजनू या स्किट चा धमाल व्हिडिओ बनवला आहे. लोचन मजनू ऍक्ट, लव्ह यु समीर चौघुले असं कॅप्शन देत पिहू ने तो व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केलाय. समीर चौघुलेने पिहू चा तो व्हिडिओ रिपोस्ट देखील केलाय. तिच्या या धमाल व्हिडिओला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल आहे. (Samir Choughule Fan Moment)
हे देखील वाचा : ऐश्वर्या आणि तितिक्षाचा रिफ्रेशिंग व्हिडिओ तुम्ही पहिला का?
हास्यजत्रा फेम समीर चौघुले असे जरी आता म्हंटले जात असले, तरी हास्यजत्रेव्यतिरिक्त ही समीर चौघुलेने मालिका, चित्रपट, नाटक अशा सगळ्या माध्यमांमध्ये काम केले आहे. वाऱ्या वरची वरात हे नाटक, कॉमेडी एक्सप्रेस हा रिऍलिटी शो, आंबट गोड, सारेच तुझ्याचसाठी यांसारख्या मालिका चंद्रमुखी, जग्गू आणि ज्युलिएट यांसारखे चित्रपट अशा प्रत्येक माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं प्रयत्न समीर चौघुले करत असतो.आणि ते करण्यात तो आज पर्यंत यशस्वी ठरला आहे. तर पिहू गोसावी ही बालकलाकार आहे. आणि सध्या ती आपल्याला तू चाल पुढं या मालिकेत अश्विनीच्या मुलीचं कुहूच पात्र करताना पाहायला मिळते.
