छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा या माध्यमातून कलाकार घराघरात पोहचतो. आणि प्रेक्षक त्याला लक्षात ही ठेवतो. आणि प्रेक्षकांना कायम इच्छा असते. आपल्या आवडत्या कलाकारांना भेटायची कित्येकांसाठी ते स्वप्न च असत. आणि ते स्वप्न पूर्ण होत नाटकांच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कलाकरांना लाईव्ह परफॉर्म करताना पाहणं ही खरं तर एक पर्वणीच आहे.आणि कलाकारानं साठी नाटक हे कायमच त्यांचं पाहिलं प्रेम असत.(Prasad Khandekar Namrata Sambherao)
हास्यजत्रा फेम प्रसाद खांडकेकर, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे हे कलाकार २०२१ पासून कुर्रर्र या नाटकाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहेत . प्रसाद खांडकेकर हे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आहेत. तर विशाखा सुभेदारनी या नाटकाची निर्मिती केली आहे. उत्तम प्रकाशयोजना, नेपथ्य आणि संगीत याने नाटकाला चार चांदच लावले आहेत.

लग्नाला अनेक वर्ष झाल्या नंतरही मुलं न होणाऱ्या आई ची तळमळ वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या नाटकात केला आहे.प्रसाद आणि नम्रता हे या नाटकात पती पत्नी आहेत आणि त्यांच्या आयुष्यातली ही गोष्ट आहे. विशाखा सुभेदार ही आई च्या भूमिकेत आहे आणि पॅडी ची एन्ट्री हा या नाटकातला खरा ट्विस्ट आहे . हे नाटक आपल्या लाडक्या विनोदवीरांचं आहे तर नाटकाला त्यांचा असा खास टच तर आहेच ह्यात काही शंका नाही. १०० प्रयोगांचा आकडा या नाटकाने पार केला असून.
८ एप्रिल २०२३ ते ७ मे २०२३ पर्यंत या नाटकाचा परदेश दौरा आहे. याच संदर्भात नम्रताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर भेटूया अमेरिका दौऱ्यात, आमचं कुर्रर्रर्र हे नाटक येत्या वीकएंड पासून आम्ही घेऊन येतोय अमेरिकेत असं कॅप्शन देत नाटकाच्या पोस्टर चा फोटो शेअर केला आहे.आणि त्यांच्या या प्रयोगांच्या तारखा ही तिच्या या पोस्ट मध्ये मेन्शन केल्या आहेत. सगळ्यांनी आवर्जून पाहावं असच हे नाटक आहे.(Prasad Khandekar Namrata Sambherao)