बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण व अभिनेता रणवीर सिंह सध्या बरेच चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांनीही आई-वडील होणार असल्याची बातमी चाहत्यांना सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर ते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसले. त्याचबरोबर काही दिवसणपूर्वी दीपिकाने ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या चित्रकरणासदेखील सुरुवात केली. प्रेग्नट असूनदेखील चित्रीकरण करतानाचे दीपिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. सध्या मात्र ती स्वतःला आराम देत आहे. त्यामुळे ती सहसा माध्यमांसमोर येणं टाळते. (deepika padukone baby bump)
दीपिका व रणवीर यांच्या घरी सप्टेंबर महिन्यात चिमुकल्याचे आगमन होणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. अशातच आता दीपिकाचा बेबी बंप दाखवतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तिच्याबरोबर तिचा पती रणवीर सिंहदेखील दिसून येत आहे.

यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘मेट गाला २०२४’च्या कार्यक्रमात दीपिका अनुपस्थित राहिलेली दिसून आली. तिच्या अनुपस्थितीने चाहते नाराज झाले आहेत. पण खूप काळ प्रतिक्षा केल्यानंतर चाहत्यांना दीपिकाच्या बेबी बंपची झलक पाहायला मिळाली आहे. दीपिकाच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिच्या मागेच रणवीर सिंह पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसून येत आहे. त्याचा चेहरा इतका स्पष्ट दिसत नाही आहे. दोघांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे.
दरम्यान आता रणवीरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दीपिका व रणवीरच्या लग्नाचे फोटो डिलिट झालेले दिसून आले आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार काही कारणांमुळे त्याने ते फोटो डिलिट केले नसून काही काळासाठी हाइड केले असल्याचे समजत आहे.
दीपिका व रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर दोघेही एकत्रितपणे दिग्दर्शिक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले आहेत. या चित्रपटामध्ये दीपिका लेडी पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ,करीना कपूर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत काम करताना दिसणार आहेत.