शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करेन अन्…”, आदेश बांदेकरच्या लेकाने सांगितलं कसं करणार लग्न?, म्हणाला, “कोर्टात जाऊन…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 6, 2024 | 2:46 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Soham Bandekar talked about he will get married to the girl of his parents' choice and he will do court marriage

"आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करेन अन्...", आदेश बांदेकरच्या लेकाने सांगितलं कसं करणार लग्न?, म्हणाला, "कोर्टात जाऊन..."

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून लोकप्रिय असलेले अभिनेते, निवेदक म्हणून आदेश बांदेकरांचा नावलौकिक आहे. तर मराठीसह हिंदी चित्रपटांतून अभिनय करत हिंदी व मराठी प्रेक्षककांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सूचित्रा बांदेकर. आदेश व सुचित्रा बांदेकर यांना कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा सोहम बांदेकरनेही याच क्षेत्रात पदार्पण केले आहे. सोहम हा सध्या अभिनेता व निर्मात्याच्या भूमिकांमध्ये पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला. त्याबरोबरच सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

अशातच तो स्टार प्रवाहवरील दोन मालिकांच्या निर्मितीची धुराही अगदी यशस्वीपणे पार पाडत आहे. स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या निर्मिती ही आदेश व सूचित्रा बांदेकरांच्या निर्मिती संस्थेअंतर्गत होत असून सोहम याकडे जातीने लक्ष देत असतो. मालिकेत सध्या ऐश्वर्या व सारंग यांचे लग्न होणार आहे. यावेळी सोहमही तिथे उपस्थित होता. यावेळी ‘इट्स मज्जा’ने सोहम बरोबर खास संवाद साधला.

या संवादादरम्यान, सोहमला त्याच्या खऱ्या आयुष्यात लग्न कधी करणार असल्याचे विचारण्यात आले. याचे उत्तर देत त्याने असं म्हटलं की, “लोकांना माझं वय हे उगाचच जास्त वाटत आहे. मी त्यांना ३२ वर्षांचा वगैरे वाटत आहे. पण मी इतका मोठा असून माझं वय २७ वर्ष इतकेच आहे” असं म्हटलं. तसेच त्याने मस्करीत “लोकांना माझं सुख पाहावत नाहीये” असंही म्हटलं. तसेच यापुढे त्याने त्याच्या भावी पत्नीविषयीच्या अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – आयसीयूमध्ये भाऊ, गणपती बाप्पाला घरी आणलं अन्…; ‘नवरी मिळे हिटलरला’मधील वल्लरीच्या आईचं खासगी आयुष्याबाबत भाष्य, म्हणाली, “बाबा नाहीत…”

सोहमने त्याच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा व्यक्त करत असं म्हटलं की, “मला जोड्याने मारणारी बायको नको. मी ज्या क्षेत्रात काम करत आहे, त्या क्षेत्रात १२ तासांची शिफ्ट असते. त्यामुळे घरी फार कमी वेळ देता येतो. त्यामुळे यांच्या दोघांत वेळेबाबत संगनमत झाले पाहिजे. तसेच या क्षेत्रातील लोकांचे कामाव्यतिरिक्त खासगी आयुष्य नसते. त्यामुळे ते समजून घेणारी व आई-वडील जी सांगतील त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे.”

आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची चर्चा, ‘जुनं फर्निचर’ व ‘नाच गं घुमा’ने आतापर्यंत किती कमावले?, एकूण कमाई तब्बल…

तसेच यापुढे सोहमने थाटामाटात किंवा फार खर्चीक पद्धतीने लग्न करणार नसल्याचे म्हटले. सोहमने नोंदणी पद्धतीने कोर्टात कुटुंबियांच्या समवेत लग्न करणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.  तसेच लग्नात होणारा खर्चाचा मी माझ्या भविष्यासाठी वापर करणार असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

Tags: marathi actormarathi entertainment newssoham bandekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Karan Johar Slams Comedian

"आईबरोबर टीव्ही बघत होतो आणि…", टीव्ही शोमध्ये खिल्ली उडवण्यावरुन संतापला करण जोहर, म्हणाला, "तुमचीच इंडस्ट्री जेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.