रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : असं आहे प्रविण तरडे यांचं घर, बायकोने शेअर केलेल्या व्हिडीओमधील ‘त्या’ गोष्टीने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 6, 2024 | 11:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
pravin tarde home

Video असं आहे प्रविण तरडे यांचं घर, बायकोने शेअर केलेल्या व्हिडीओमधील 'त्या' गोष्टीने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

सध्या सर्वत्र आयपीएलची क्रेज सुरु असलेली पाहायला मिळत आहे. बरेचसे आयपीएल प्रेमी हे स्टेडिअममध्ये जाऊन क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहेत. तर काही मंडळी ही घरच्या घरीच आयपीएलचा आनंद घेत आहेत. या क्रिकेटप्रेमींमध्ये आता कलाकार मंडळीही सहभागी झाली आहेत. यंदाच्या आयपीएलला अनेक कलाकार मंडळींनी स्टेडिअममध्ये जात क्रिकेटचा आनंद लुटला, याचे अनेक फोटो, व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केलेले पाहायला मिळाले. अशातच एका मराठमोळ्या कलाकार कुटुंबाचा आयपीएलचा आनंद लुटतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Pravin Tarde Family Time)

अशातच आता एका मराठमोळ्या कलाकाराने सहकुटुंब आयपीएलचा आनंद लुटला आहे. तरडे कुटुंब सध्या सुट्ट्यांमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसत आहे. प्रविण तरडे व त्यांची पत्नी स्नेहल तरडे सध्या त्यांच्या कुटुंबासह एन्जॉय करताना दिसत आहेत. प्रविण व स्नेहल त्यांच्या लेकाबरोबर घरातल्या घरात वेळ घालवतानाचा व्हिडीओ स्नेहलने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तरडे कुटुंब एकत्र खूप आनंदात दिसत आहे.

आणखी वाचा – “मी मुसलमान व्यक्तीशी लग्न केलं म्हणून…”, स्वतःच्या नावावरुन दीपाली सय्यदचे स्पष्ट मत, म्हणाली, “इतकं सोप्पं…”

View this post on Instagram

A post shared by Snehal Tarde (@snehprat1311)

स्नेहलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रविण व त्यांचा लेक आयपीएलचा आनंद लुटताना दिसत आहे. यावेळी स्नेहलने खास त्यांच्यासाठी पॉपकॉर्न व ज्यूसचा बेत केलेला दिसला. त्यानंतर तिघेही एकत्र बसून आयपीएल बघताना दिसले. या व्हिडीओमध्ये प्रविण तरडे यांच्या घरची झलक पाहायला मिळत आहे. भल्या मोठ्या घराचा हॉल, सुटसुटीत किचन पाहणं रंजक ठरतंय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत, “जमिनीवर पाय असणारी माणसं. तुमच्या सिनेमातूनच नाही तर आयुष्यातून पण खूप शिकण्यासारखे आहे”, असं म्हणत त्यांच्या कुटुंबाचं कौतुक केलं.

आणखी वाचा – रुपालीमुळे कुटुंबातील आणखी एका सदस्याचा बळी?, देवी आईच्या लेकी राजाध्यक्ष कुटुंबाला वाचवू शकतील का? ‘सातव्या मुलीची…’मध्ये नवा ट्विस्ट

अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार अशी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवीण तरडे यांची ओळख आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामुळे प्रविण तरडे चर्चेत आले. तसेच ‘देऊळ बंद’ या सिनेमाचं दिग्दर्शनही तरडेंनी केलं होतं. प्रवीण तरडेंनी ‘कन्यादान’, ‘कुंकू’, ‘कुटुंब’, ‘तुझं माझं जमेना’, ‘पिंजरा’ या मालिकांचं लेखन केलं आहे.

Tags: pravin tarde familyPravin Tarde Family Timepravin tarde sonpravin tarde wife
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Juilee Jogalekar And Rohit Raut On Live in Relationship

"लग्नाआधी तीन वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिलो अन्…", रोहित राऊत-जुईली जोगळेकरचा खुलासा, म्हणाली, "आमच्या आई-बाबांनी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.