छोट्या पडद्यावरील मालिका या अनेक प्रेक्षकांच्या आवडीचा विषय असतात. आजही असा एक प्रेक्षक वर्ग आहे जो रोज नित्यनियमाने मालिका बघतो आणि त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो. मालिकेतील पात्र, त्याची कथा आवडत असल्यास त्यावर आपलं मत व्यक्त करतात. मात्र काही नवीन ट्विस्ट किंवा नवीन वळण प्रेक्षकांना आवडले नाही तर त्याबद्दल नाराजीही व्यक्त करतात. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला, जो काही प्रेक्षकांना आवडला, तर काहींना तो आवडला नाही. या प्रोमोमध्ये रुपालील संमोहित करण्याची जी शक्ती मिळाली आहे, त्या शक्तीचा ती राजाध्यक्ष कुटुंबियांविरुद्ध वापर करत आहे. या शक्तीविरुद्ध कसे लढता येईल याचा नेत्रा-अद्वैत विचार करत आहेत. हेच या प्रोमोमध्ये पाहायला मिळत असून प्रोमोवर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या प्रोमोखाली एका नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “कुठे तरी आता असं वाटू लागलं आहे की लेखक आता बालिश बुद्धिने कथा लिहित आहेत. घरातली सर्वच मंडळी लहान मुलांसारखे आता घरामध्ये राक्षसाचा खेळ खेळत आहेत असं वाटत आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “कृपया मालिका वाढवायची आहे, म्हणून काही पण दाखवू नका. असं दाखवून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे. गेले कित्येक भाग विरोचक श्रेष्ठ दाखवला आहे, मुळात जिथे देवाचा वास असतो, तिथे दुष्ट शक्ती नसते. एवढं साधं माहीत नाही का?, देवाचे वरदान असलेल्या मुलींना मूर्ख दाखवले आहे. असं केलं पाहिजे, वाट बघितली पाहिजे, विचार केला पाहिजे सतत हेच डायलॉग दाखवले आहेत”.
आणखी वाचा – ‘सैराट’मधील परश्याचे मित्र आता जगत आहेत असं आयुष्य, सध्या नेमकं काय काम करतात?, लूकही बदलला अन्…
तर आणखी एकाने “हा मूर्खपणा दाखवल्याबद्दल त्यांच्यावर खटला भरला पाहिजे, ते समाजाला चुकीचा संदेश देत आहेत. प्रत्येक भाग हा निव्वळ बकवास आहे, जर त्यांच्याकडे काही कंटेट नसेल तर त्यांनी फक्त शो संपवावा आणि लेखकांनी सक्रियपणे राजीनामा द्यावा. काही नैतिक जबाबदारी घेऊन हा मूर्खपणा संपवावा” असं म्हटलं पाहिजे. तर आणखी एकाने “मूर्खांनो, जे देवाचे अवतार घेतात, ते इतके कामजोर कसे दाखवतात. उगाच काही पण नका दाखवू.” असं म्हटलं आहे. तर काहींनी त्यांना ही मालिका आवडत असून त्यांनी या प्रोमोला लाईक्स व कमेंट्सद्वारे संमती दर्शवली आहे.