कलाकारांच्या आयुष्यात महत्वाचा घटक म्हणजे त्याचा चाहता वर्ग. लहानपणासून आपण पाहत आलो आहोत कि रजनीकांत, अमिताभ बच्चन, अशोक सराफ यांच्या इतकाच त्यांचा चाहता वर्ग ही तेवढाच प्रसिद्ध आहे. प्रेक्षकांनी केलेली वाहवा असो व दिलेले सल्ले दोन्ही ही कलाकारासाठी त्याच्या वाटचाली साठी महत्वाचे असतात. एक सच्चा प्रेक्षक नेहमी अभिनेता, अभिनेत्री यांना त्यांच्या चांगल्या अभिनया सोबतचा अभिनयातील विविध पैलूंबद्दल सांगत असतो. काही कलाकारांचे फॅन्स नेहमी आपल्या आवडत्या कलाकाराच्या आनंदासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो.(Jahnavi Killekar Fan Moment)
आपल्या आवडत्या कलाकाराच्या वाढदिवसानिमित्त एखादा नेहमी काही तरी हटके, कलाकाराला आवडेल असं करत असतो. प्रेक्षकांनी दिलेल्या भेटवस्तू पाहून कधी कधी कलाकार भावुक होताना ही दिसतात. असच काहीस झालाय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोबत. जान्हवीच्या वाढदिवसानिम्मित तिच्या एका चाहत्याने तिला दिलेल्या भेटीबद्दल तिने पोस्ट करत माहिती दिली आहे. पोस्ट करत जान्हवीने चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.
हे देखील वाचा- गुरु उभा पाठीशी! उत्कर्ष आणि जयचा महेश मांजरेकरां सोबतचा व्हिडिओ चर्चेत..
काय आहे चाहत्याची अनोखी भेट
अमोल सोनार नामक जान्हवीच्या चाहत्याने जान्हवीच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गावात १०० झाडे लावून वेगळा संदेश दिला आहे. तर जान्हवीने पुढे सांगितले कि वर्षभर ते जान्हवीच्या नावाने दानधर्म करत आहेत शिवाय वृद्धाश्रमात असलेल्या वयस्कर मंडळींना अन्नदान देखील करत आहेत. जानव्हीने पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे ‘आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात खुप “Fan moment” आलेत…पण आज एक विलक्षण गोष्ट माझ्या समोर आली, नाशिक मध्ये राहणारे एक व्यक्ति ” अमोल सोनार” @sonar3096 हे मागच्या एक वर्षापासुन माझ्या नावाने दानधर्म करत आहेत.. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी त्यांचा गावात १०० वृक्षा रोपण केले…आणि सतत ते माझ्या नावाने वृद्धाश्रमात वृद्धांना अन्नदान करतायतआज मी स्वतः ला खुप नशिबवान समजतेय की, अशी माणसं माझ्या आयुष्यात आहेत, माझे चाहते आहेत खरच मनापासुन धन्यवाद… तुमचे खुपखुप आभार… असच प्रेम माझ्यावर कायम करत रहा…धन्यवाद'(Jahnavi Killekar Fan Moment)

हे देखील वाचा- आणि तिने मला रात्री ११ वाजता..’ असं म्हणत शिवने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
चाहत्यांच्या या प्रेमामुळे जान्हवी भावुक झाल्याचं तिच्या पोस्ट मधून दिसत आहे. ती सध्या कलर्स वाहिनी वरील भाग्य दिले तू मला लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. नकारात्मक पात्र साकारत असून ही जान्हवीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांकडून मिळणारं हे प्रेम कलाकारांना काम करत राहण्यासाठी नेहमीच प्रेरित करत असतात. प्रेक्षकांच्या प्रेमाची हे पोह्चपावती कलाकारासाठी आयुष्यातील सगळ्यात महत्वाची भेट असेल एवढं नक्की.
