रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या आई-वडिलांची मी…”, दत्तक मुलगी असल्याच्या खोट्या बातमीवर श्रिया पिळगांवकरचं भाष्य, म्हणाली, “प्रसिद्धी स्टंट म्हणून माझ्याबद्दल…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 25, 2024 | 5:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shriya Pilgaonkar On Fake News

"माझ्या आई-वडिलांची मी...", दत्तक मुलगी असल्याच्या खोट्या बातमीवर श्रिया पिळगांवकरचं भाष्य, म्हणाली, "प्रसिद्धी स्टंट म्हणून माझ्याबद्दल..."

अभिनेते सचिन पिळगांवकर व अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर ही सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडींपैकी एक जोडी आहे. या जोडीने आजवर अनेक चित्रपटातील अभिनयांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या दोन्ही कलाकारांपाठोपाठ आता त्यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगांवकरदेखील सिनेसृष्टीत पाऊल टाकत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या श्रिया ‘ब्रोकन न्यूज २’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आली आहे. मध्यंतरी श्रिया ही सुप्रिया व सचिन यांची दत्तक मुलगी असल्याच्या बातम्या येत होत्या. यावर श्रियाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Shriya Pilgaonkar On Fake News)

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत श्रियाने दत्तक मुलगी असल्याच्या व्हायरल झालेल्या बातमीवरुन तिने भाष्य केलं. यावर ती म्हणाली, “एका बातमीत कुठेतरी म्हटलं होतं की, मला दत्तक घेण्यात आलं होतं. पण तसं नाही, मी माझ्या आई-वडिलांची दत्तक मुलगी नाही. त्यांनी मला दत्तक घेतल्याची एक बातमी आली होती, पण ती पूर्णपणे खोटी बातमी आहे”.

आणखी वाचा – सततची भांडणं, आई-वडिलांचं वेगळं राहणं अन्…; वयाच्या १८व्या वर्षांपासून क्षिती जोग राहत होती एकटी, म्हणाली, “मी स्वतः जबाबदार आहे…”

View this post on Instagram

A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

श्रिया पुढे म्हणाली, “खरं तर मी काहीतरी स्पष्टीकरण द्यावं असाही हा विषय नाही, कारण मी माझी बाजू मांडण्यासाठी माझं जन्म प्रमाणपत्र इन्स्टाग्रामवर दाखवणार नाही आहे. पण हो, ही बातमी अजिबात खरी नसली तरी हास्यास्पद नक्कीच होती. पण याशिवाय माझ्याबद्दल इतर कोणत्याही वाईट गोष्टी लिहिल्या गेलेल्या नाहीत”.खरं तर मी या क्षणापुरत बातम्यांमध्ये राहण्याचा विचार करत नाही, तर येणाऱ्या वर्षांसाठी प्रासंगिक राहण्याचा विचार करते. त्यामुळे मी छोट्या-मोठ्या गोष्टींकडे पाहत नाही. माझ्यासाठी एक कलाकार म्हणून तुम्ही किती शिकत आहात आणि विकसित होत आहात हे महत्त्वाचं आहे.

आणखी वाचा – विरोचकाकडून रुपालीला एक वेगळीच शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबियांवर मोठं संकट, देवी आईच्या लेकी या संकटाचा सामना करणार?

पुढे श्रिया असंही म्हणाली, “माझे वडील ६० वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहेत आणि अजूनही ते काम करत आहेत. याचं कारण म्हणजे त्यांची सतत काहीतरी शिकण्याची जिद्द. मी वैयक्तिकरित्या कधीही बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न केला नाही किंवा प्रसिद्धी स्टंट म्हणून माझ्याबद्दल खोट्या बातम्या दिल्या नाहीत. माझ्याकडे चांगला प्रोजेक्ट असेल तर त्याबद्दल मी माध्यमांसमोर बोलू शकते पण फक्त बातम्यांमध्ये राहण्यासाठी मी माझ्याबद्दल खोटी माहिती देणार नाही”, असंही श्रिया म्हणाली.

Tags: entertainmentsachin and shriya pilgaonkarshriya pilgaonkarShriya Pilgaonkar On Fake News
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Abhishek Bachchan Wins Heart

मुलगा असावा तर असा! अभिषेक बच्चनने वडिलांसमोर बसायला दिला नकार, मान खाली घालून स्टेजवरुन खाली आला अन्…; बिग बींच्या संस्कारांचं होत आहे कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.