झी मराठी वाहिनीवरील सध्या चांगलीच चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’. मालिकेत दिवसेंदिवस येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे, खिळवून ठेवणाऱ्या कथानकामुळे त्याचबरोबर कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका बघण्याचा प्रेक्षकांचा कल अधिकच वाढत आहे. सासू-सूनांची भांडणं, कुरघोड्या न दाखवता एका आगळ्यावेगळ्या कथानकामुळे या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे.
मालिकेत नुकताच नेत्राने विरोचकाचा वध केल्याचे पाहायला मिळाले. अद्वैतला विरोचकाच्या तावडीतून सोडताना नेत्रा विरोचकाचा वध करत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यामुळे विरोचकाचा अंत होत नाही. यानंतर विरोचक पुन्हा जीवंत होते आणि तिला दक्षिण दिशेकडे कुणीतरी बोलवतानाचे पाहायला मिळाले आहे. त्या दिशेने जात असतानाच रुपालीच्या हाती विरोचकाकडून एका वाद्याची खूण मिळते, जे दिसायला वीण्यासारखे आहे. मात्र या वीण्याला दोन तंबोरे आहेत आणि तेही उलट दिशेने. दरम्यान, या वाद्याचे वादन करुन रुपालीला एक शक्ती प्राप्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अशातच नुकताच एक एक प्रोमोही समोर आला आहे, ज्यामध्ये राजाध्यक्ष कुटुंबाला एका संकटाचा सामना करावा लागत आहे. विरोचकाच्या हाती लागलेलेआय वीणासारख्या वाद्याचे वादन करताना ती जसजसं वादन करते, तसतसं राजाध्यक्ष कुटुंबातील कुणाला काहीतरी होते. या व्हिडीओमध्ये विरोचक वाद्य वाजवताना भूकंप झाल्याचेदेखील म्हणताना दिससात आहे. त्यामुळे आता विरोचक या वाद्याचे सहाय्याने राजाध्यक्ष कुटुंबियांना आणखी संकटात आणणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
दरम्यान, आता या शक्तीचा व रुपालीचा वापर करुन विरोचक राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट आणणार? यामुळे राजाध्यक्ष कुटुंबियांसह नेत्रा-अद्वैत यांच्यावर काय परिणाम होणार? किंवा नेत्रा-अद्वैत विरोचकाच्या या शक्तीविरुद्ध कसे लढणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक आगामी भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत.