शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार”, मंगळसूत्रावरील चर्चांवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मांडलं मत, पोस्ट करत म्हणाली, “लग्न संस्कृती…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 22, 2024 | 4:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi Actress Radhika Deshpande shared a special post on Instagram related to Mangalsutra see the details

“मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार”, मंगळसूत्रावरील चर्चांवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मांडलं मत, पोस्ट करत म्हणाली, “लग्न संस्कृती...”

समाज माध्यमांवर आपली मतं, विचार एकावेळी अनेकांपर्यंत पोहोचवण्याची मोठी ताकद असते. अर्थात ही मतं, विचार कुणाला पटतात किंवा नाही. पण आजकल एखाद्या कलाकाराने त्याची वैयक्तिक मते मांडली तर ती कुणाला पटतात किंवा नाही आणि मग यावरुन मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होतं. अशातच सोशल मीडियावर नुकतीच एक अभिनेत्री चर्चेत आली आहे ती म्हणजे क्षिती जोग. क्षिती जोगने एका मुलाखतीत लग्नानंतरचा एक किस्सा सांगत मंगळसूत्र घालण्याबाबत आपलं मत मांडलं.

यावेळी तिने तिचं मत मांडताना असं म्हटलं की, “मला मंगळसूत्र खूप आवडतं. तो खूप सुंदर दागिना आहे. पण ते घालणं किंवा न् घालणं हे माझ्या मनावर आहे. माझ्या मनात असेल तेव्हा मी साडी, गजरा, टिकली, सगळं म्हणजे घालेन आणि नाही तर नाही. पण मी हे कुणासाठी करत नाही. मी माझ्यासाठी करते. मला माहिती आहे. माझं लग्न झालं आहे. मग मंगळसूत्र घातलं काय किंवा न घातलं काय”. यावर समाज माध्यमांवर अनेक मतमतांतरे व्यक्त झाली होती. अशातच आता अभिनेत्री राधिका देशपांडेने तिचे मत व्यक्त केलं आहे.

सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट करत तिने असं म्हटलं आहे की, “मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार. माझं लग्नं नुकतंच झालं असो किंवा नसो, माझा नवरा माझा आहे आणि मी त्याची बायको आहे याची आठवण करून देण्यासाठी मी मंगळसूत्र घालत नसते. त्यामुळे आत्ताच सांगते मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. फरक पडतो. मुळात मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केंव्हा, कधी, कशाला ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला का देऊ? धमकी वजा सूचना समजा”.

View this post on Instagram

A post shared by Radhika Deshpande (@radhika_deshpande)

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “उत्तर द्यायची वेळ नाही पण आज मला प्रश्न नक्कीच पडला आहे. कोण होतात हे स्त्री धनाचा हिशोब, झडती, माहिती घेणारे? हे सगळं घेऊन माझं सोनं वाटून द्यायला तो सत्यनारायणाचा प्रसाद आहे? माझं सोनं हे माझं आहे, ते सौभाग्याचं लेणं आहे. आम्ही स्त्रिया सहज बोलता बोलता त्याला ‘प्रीटी ज्वेलरी‘ असं बोलून जातो. पण बहुतांश भारतीय स्त्रियांकरता सोनं, जे आई-वडिलांनी, सासु-सासऱ्यांनी दिलं आहे, जे तिच्या किंवा नवऱ्याच्या परिश्रमातून विकत घेतलं आहे, अशा सोन्याचं वजन किती बरं असेल?”

आणखी वाचा – “घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना…”; मराठी कलाकारांचा चिन्मय मांडलेकरला पाठिंबा व कारवाईची मागणी, म्हणाले, “आम्ही विनंती करतो की…”

यापुढे राधिकाने यात असं म्हटलं आहे की, “काही गोष्टी आकड्यात मोजता येत नसतात. अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांना ते नाही कळायचं. आम्ही स्त्रिया मंगळसूत्राला जीवापाड जपतो. काळजी पोटी ते ठराविक ठिकाणी घालत नाही. माझ्या घरात तर मंगळसूत्र ठेवायची एक स्वतंत्र जागा आहे. घर घ्यायची वेळ आली तेव्हा मी माझं सोन विकलं पण मंगळसूत्र मुठीतून सुटलं नाही. आणि ह्या धनाचा हिशोब आणि वाटप आम्ही होऊ द्यायचा, ह्या डाव्या नेत्यांच्या आणि त्यांच्या पार्टीच्या धोरणांच्या पूर्णत्वा करता! मागे टिकली/बिंदी वरून चर्चा उधळली, इतक्यात मंगळसूत्र चर्चेचा विषय ठरलं तर उद्या लग्न संस्कृतीवर काहीतरी घणाघाती बोलतील. “

आणखी वाचा – शुभंकर-अमृतानंतर आणखी एक कलाकार जोडीने बांधली लग्नगाठ, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम चेतन वडनेरेचा गर्लफ्रेंड ऋजुताबरोबर शाही विवाह संपन्न

यापुढे तिने “मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही! विषय संपला. असं म्हणत “हा फोटो २००५ सालचा आहे, माझ्या लग्नातला. विधी सुरू होण्याआगोदरचा असल्यामुळे यात मंगळसूत्र नाही. पण तेव्हापासून हा दागिना सौभाग्याचं लेणं ठरला. फोटो जुना आहे पण जुनं ते सोनंच नाही का? म्हणूनच टिकवून ठेवायचं” असं म्हटलं आहे.    

Tags: marathi actressmarathi entertainment newsRadhika Deshpande
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial new update see the details

विरोचकाने रुपालीला दिली एक अद्भूत शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबियांवर मोठं संकट, नेत्रा-अद्वैत कसा करणार या संकटाचा सामना?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.