सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विरोचकाने रुपालीला दिली एक अद्भूत शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबियांवर मोठं संकट, नेत्रा-अद्वैत कसा करणार या संकटाचा सामना?

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 22, 2024 | 5:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial new update see the details

विरोचकाने रुपालीला दिली एक अद्भूत शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबियांवर मोठं संकट, नेत्रा-अद्वैत कसा करणार या संकटाचा सामना?

झी मराठी वाहिनीवरील सध्या चांगलीच चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’. मालिकेत दिवसेंदिवस येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे, खिळवून ठेवणाऱ्या कथानकामुळे त्याचबरोबर कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका बघण्याचा प्रेक्षकांचा कल अधिकच वाढत आहे. सासू-सूनांची भांडणं, कुरघोड्या न दाखवता एका आगळ्यावेगळ्या कथानकामुळे या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे.

मालिकेत नुकताच नेत्राने विरोचकाचा वध केल्याचे पाहायला मिळाले. अद्वैतला विरोचकाच्या तावडीतून सोडताना नेत्रा विरोचकाचा वध करत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यामुळे विरोचकाचा अंत होत नाही. यानंतर विरोचक पुन्हा जीवंत होते आणि तिला दक्षिण दिशेकडे कुणीतरी बोलवतानाचे पाहायला मिळाले आहे. त्या दिशेने जात असतानाच रुपालीच्या हाती विरोचकाकडून एका वाद्याची खूण मिळते, जे दिसायला वीण्यासारखे आहे. मात्र या वीण्याला दोन तंबोरे आहेत आणि तेही उलट दिशेने. दरम्यान, या वाद्याचे वादन करुन रुपालीला एक शक्ती प्राप्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार”, मंगळसूत्रावरील चर्चांवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मांडलं मत, पोस्ट करत म्हणाली, “लग्न संस्कृती…”

अशातच नुकताच एक एक प्रोमोही समोर आला आहे, ज्यामध्ये राजाध्यक्ष कुटुंबाला एका संकटाचा सामना करावा लागत आहे. विरोचकाच्या हाती लागलेलेआय वीणासारख्या वाद्याचे वादन करताना ती जसजसं वादन करते, तसतसं राजाध्यक्ष कुटुंबातील कुणाला काहीतरी होते. या व्हिडीओमध्ये विरोचक वाद्य वाजवताना भूकंप झाल्याचेदेखील म्हणताना दिससात आहे. त्यामुळे आता विरोचक या वाद्याचे सहाय्याने राजाध्यक्ष कुटुंबियांना आणखी संकटात आणणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

आणखी वाचा – “घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना…”; मराठी कलाकारांचा चिन्मय मांडलेकरला पाठिंबा व कारवाईची मागणी, म्हणाले, “आम्ही विनंती करतो की…”

दरम्यान, आता या शक्तीचा व रुपालीचा वापर करुन विरोचक राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट आणणार? यामुळे राजाध्यक्ष कुटुंबियांसह नेत्रा-अद्वैत यांच्यावर काय परिणाम होणार? किंवा नेत्रा-अद्वैत विरोचकाच्या या शक्तीविरुद्ध कसे लढणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक आगामी भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत.      

Tags: marathi entertainment newsmarathi serialSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
23 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

हनुमान जयंतीनिमित्त ‘या’ राशींचे नशीब उजळणार, हनुमानजींच्या आशीर्वादाने सर्व समस्यांचे निराकरण होणार, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.