शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बायकांच्या भूमिका करायला स्त्रिया नाहीत का?”, निलेश साबळेच्या नव्या शोचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “‘चला हवा येऊ द्या’ सारखंच…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 19, 2024 | 4:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hastay Na Hasaylach Pahije new promo audience expressed displeasure over the female characters played by Onkar Bhojane and Bhau Kadam

‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ शोमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम यांनी साकारलेल्या स्त्री-पात्रांवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

डॉ. निलेश साबळेच्या ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ या शोची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या शोची घोषणा झाल्यापासूनच अनेकांना या शोची उत्सुकता लागून राहिली होती. गेले काही दिवस या शोचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अशातच आता या शोचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे.  या नवीन प्रोमोमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम यांचे प्रहसन चालू असल्याचे पाहायला मिळत असून त्यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा” चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसतानाचे दिसत आहे.

नुकताच ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाचा हा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित असणार आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या स्किटमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम हे दोघेही स्त्रीपात्र साकारत असून त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील अभिनेत्रींचा लूक केला आहे. अनेकांना हा प्रोमो आवडला आहे, मात्र काहींनी या प्रोमोवर टीका केली आहे.

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

आणखी वाचा – बहूचर्चित ‘द फॅमिली मॅन’ सीरिजच्या आगामी सीझनच्या शूटिंगला सुरुवात, लवकरच प्रदर्शित होणार तिसरा सीझन, जाणून घ्या…

ओंकार भोजने व भाऊ कदम यांनी साकारलेल्या स्त्री पात्रांवर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. “साडी नेसून कॉमेडी करायची गरज आहे का?, हा कार्यक्रम अगदी ’चला हवा येऊ द्या’ सारखाच आहे, पुन्हा तेच तेच जबरदस्तीचं हास्य, बायकांचे रोल करायला बायका मिळत नाहीत का?, फॉरमॅट तोच आहे फक्त नाव नवीन आहे.” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओवर प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – Video : ‘चला हवा येऊ द्या’मधून बाहेर पडल्यानंतर निलेश साबळेचा नवा शो, मात्र भाऊ कदमची साथ कायम, म्हणाला, “तुमचे आशिर्वाद…”

दरम्यान, ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे?’ या शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. येत्या २७ तारखेपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.  

Tags: Hastay Na Hasaylach PahijeMarathi Comedy Showmarathi entertainemnt news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
kusha kapila love rumors

सहा वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर कुशा कपिला कॉमेडियनला करत आहे डेट, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.