शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तेल मालिश अन्…; आईकडून लाड करुन घेत आहे मृण्मयी देशपांडे, बहीण गौतमीला चिडवत व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, “प्रवास करुन…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 18, 2024 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mrunmayee Deshpande Video

तेल मालिश अन्…; आईकडून लाड करुन घेत आहे मृण्मयी देशपांडे, बहीण गौतमीला चिडवत व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, "प्रवास करुन..."

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मृण्मयीने अभिनयासह सूत्रसंचालक म्हणून उत्तमरीत्या जबाबदारी पेलवली. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयीचे नाव आवर्जून घेतलं जातं. सोशल मीडियावरही मृण्मयी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच काही ना काही शेअर करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मृण्मयी आणि तिची बहीण गौतमी यांचे अनेक व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. (Mrunmayee Deshpande Video)

देशपांडे सिस्टर्सची धम्माल, मस्ती प्रेक्षकांना पाहायला नेहमीच आवडतं. अशातच आता मृण्मयीने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र हा व्हिडीओ मृण्मयीने तिच्या बहिणीबरोबर न शूट करता तिच्या आईबरोबर शूट केला आहे. मृण्मयी सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याच पाहायला मिळत आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा मृण्मयीचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मृण्मयी सध्या व्यस्त आहे.

आणखी वाचा – वरण-भात, आमरस अन्…; मुग्धा वैशंपायनने बनवला पंचपक्वान्नांचा नैवेद्य, नवऱ्याकडून भरभरुन कौतुक, म्हणाला, “माझ्या बायकोने…”

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande – Rao (@mrunmayeedeshpande)

या व्हिडीओमध्ये मृण्मयी तिच्या आईकडून सेवा करुन घेताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये मृण्मयी असं बोलताना दिसत आहे की, “चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सततचा मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक, मुंबई-कोल्हापूर असा प्रवास करुन घरी आल्यानंतर ज्या गोष्टीची सर्वात जास्त आवश्यकता असते ती गोष्ट म्हणजे आईच्या हाताने डोक्याला मालिश. व्हिडीओमध्ये मृण्मयी तिच्या आईकडून डोक्याला मसाज करुन घेताना दिसत आहे. म्हणजेच या व्हिडीओमध्ये मृण्मयीची आई लेकीच्या डोक्याला तेल मालिश करताना दिसत आहे.

आणखी वाचा – साखरपुड्याच्या अंगठीची पारूवर मोठी जबाबदारी, प्रीतम दिशाच्या साखरपुड्यात येणार का अडथळा?, काय घडणार?

मृण्मयी तिच्या आईच्या हाताने तेल मालिश करून घेताना खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी आनंदात तिने आईकडून लाड पुरवून घेतानाचा हा व्हिडीओ शूट केला आहे. “लाड = आई = लाड टूक टूक गौतू”, असं कॅप्शन देत तिने तिची बहीण गौतमीला ही पोस्ट टॅग करत चिडवलं आहे. आईच्या हातचं तेल मसाज ही प्रत्येकाच्या जवळची गोष्ट आहे. त्यामुळे मृण्मयीने हा खास व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शविली आहे.

Tags: marathi actressMrunmayee Deshpande and gautami DeshpandeMrunmayee Deshpande Videomrunmayee deshpande with mother
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Johnny Liver On Gulabi Sadi

Video : जॉनी लिव्हर यांचा मुलगा व लेकीसह 'गुलाबी साडी'वर भन्नाट डान्स, चेहऱ्यावरचे हावभाव पाहून सगळ्यांनाच हसू अनावर, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.