सध्या सर्वत्र ‘गुलाबी साडी’ या गाण्याची क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. गुलाबी साडी या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे. अगदी लहान-मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तसेच अगदी कलाकार मंडळींपर्यंत या गाण्याची भुरळ पडली आहे. या गाण्यावर लाखो रील व्हिडीओ बनवले जात आहेत. अगदी नटून थटून महिलांवर या गाण्यावर रील बनवताना दिसत आहेत. अशातच या गाण्याची भुरळ आता विनोदाचा बादशाह जॉनी लिव्हर यांना देखील पडली. जॉनी लिव्हर यांचा गुलाबी साडी या गाण्यावरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Johnny Liver On Gulabi Sadi)
जॉनी लिव्हर या गाण्याचे फॅन झाले असून त्यांनी त्यांच्या मुलांसह या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळत आहे. जॉनी यांना जेमी आणि जेसी अशी दोन मुलं आहेत. वडिलांसारखीच जेमी विनोदी असून ती कन्टेन्ट क्रिएटर म्हणून काम पाहते. तर जेसीदेखील बऱ्यापैकी सिनेसृष्टीत सक्रिय असलेला पाहायला मिळतो. वडिलांबरोबर तो अनेकदा चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावताना दिसतो. जॉनी लिव्हर यांचं त्यांच्या मुलांबरोबर खास बॉण्डिंग आहे.
जॉनी यांनी त्यांच्या मुलांबरोबर ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर थिरकताना दिसले आहेत. या गाण्यावर तिघांनी अतिशय मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक खळखळवून हसले. बाप लोकांचा हा गुलाबी साडीवरील फनी व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरलं नाही. या व्हिडीओमध्ये तिघांच्या एक्स्प्रेशनने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. जॉनी यांच्या कॉमेडी हावभावाचे अनेक चाहते दिवाने आहेत. त्यांचा हा डान्स व्हिडीओ पाहूनही अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.
जॉनी यांनी आजवर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावरही ते बऱ्यापैकी सक्रिय असतात. जॉनी यांची लेक जेमी ही देखील सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच कलाकारांच्या मिमिक्री करताना असते. आता लिव्हर फॅमिलीने गुलाबी साडीवर केलेला हा जबरदस्त फनी डान्स व्हिडीओ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.