शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“देवाच्या गाण्याची वाट कशाला लावता?”, अमृता फडणवीस यांचं ‘हे राम’ गाणं ऐकून भडकले प्रेक्षक, म्हणाले, “आमच्यावर दया करा”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 17, 2024 | 4:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Fadnavis Troll

"देवाच्या गाण्याची वाट कशाला लावता?", अमृता फडणवीस यांचं 'हे राम' गाणं ऐकून भडकले प्रेक्षक, म्हणाले, "आमच्यावर दया करा"

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची जोडी कायम चर्चेत असते. या दोघांकडे ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिलं जातं. देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची गायिका म्हणून ओळख सर्वांनाच झाली आहे. अमृता फडणवीस या बँकर असण्याशिवाय गायिका म्हणून विशेष सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेतील अनेक गाणी गायली आहेत. सोशल मीडियावरही त्या बऱ्यापैकी सक्रिय असतात. (Amruta Fadnavis Troll)

अमृता त्यांची गायनाची आवड नेहमीच जोपासताना दिसतात. अशातच यंदाच्या राम नवमीनिमित्त अमृता यांचं नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. “हे राम” हे नवं गाणं यंदाच्या रामनवमीनिमित्त प्रदर्शित झालं आहे. हे गाणं गायक कैलास खैर आणि गायिका अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. अमृता यांनी या गाण्याचा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – Video : सजली रामनगरी! अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला सूर्यतिलक, भक्तीमय वातावरणामध्ये दंग झाले भाविक, दर्शनासाठी तुफान गर्दी

View this post on Instagram

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

अमृता यांनी याआधी देखील बरेचदा ट्रोल करण्यात आलं आहे. गाण्यांचे व्हिडीओ व अनेक हटके फोटोशूट शेअर करताच त्यांना अनेकदा नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अशातच रामनवमीनिमित्त शेअर केलेल्या एका व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत अमृता यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत, “हे राम !! आताच झोपेतून उठले होते, आता परत झोपते”, असं म्हटलं आहे. तर एकाने, “कशाला वाट लावता मामी देवाच्या नावाची”, असं म्हणत ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा – “टीव्ही मागची दुनिया कशी ते आम्हालाच माहित”, मालिकेत काम करण्यावरुन असं का बोलला राकेश बापट?, म्हणाला, “तिथलं वातावरण…”

याशिवाय काही नेटकऱ्यांनी, “तुमचं गाणं ऐकून प्रभू श्रीराम पुन्हा वनवासाला जातील. कशाला नाही जमत ती थेरं करता”, “प्रभू रामभक्त आहे म्हणून शांत आहे”, “मॉडेलिंगपर्यंत ठीक होतं पण गायन करणं गरजेचं आहे का?”, असं म्हटलं आहे. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

Tags: amruta fadnavisAmruta Fadnavis TrollDevendra Fadnavis Wifeentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Kranti Redkar Daughter

Video : बाथरुममध्ये 'ती' गोष्ट नसल्यामुळे क्रांती रेडकरच्या लेकीचा रडून गोंधळ, अभिनेत्रीने दाखवली घराची झलक, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.