रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“संसारात सून म्हणून कमी पडले आणि…”, विशाखा सुभेदारांनी बोलून दाखवली ‘ती’ खंत, म्हणाल्या, “माझ्या सासूबाईंसाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 15, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vishakha Shubhedar expressed opinion about her future daughter-in-law

"संसारात सून म्हणून कमी पडले आणि...", विशाखा सुभेदारांनी बोलून दाखवली 'ती' खंत, म्हणाल्या, "माझ्या सासूबाईंसाठी..."

मराठी विनोदी विश्वातील एक लोकप्रिय व सुप्रसिद्ध नाव म्हणजे विशाखा सुभेदार. ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारख्या काही विनोदी कार्यक्रमांतून अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार घराघरांत पोहोचल्या. विनोदी भूमिकांसह त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरानंजन केले आहे. विशाखा यांनी केवळ पोट धरुन हसवणारी विनोदी भूमिकेसह, राग व चीड येईल अशी खलनायिकाही त्या उत्तमरित्या निभावत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत त्या साकारत असलेल्या ‘रागिणी’

या मालिकेत विशाखा यांनी रागिणी भूमिकेतून एका स्वार्थी व कटकारस्थान करणाऱ्या आईची भूमिका साकारली आहे. याच मालिकेच्या निमित्ताने विशाखा यांनी ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी त्यांना “मालिकेत ज्याप्रमाणे तुम्हाला मुलगा आणि सून आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला खऱ्या आयुष्यातही एक मुलगा आहे. तर तुमच्या होणाऱ्या सूनेकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत का?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत त्या म्हणाल्या, “खरंतर कलाकार झाल्यानंतर संसारासाठी आणि माझ्या सासूबाईंसाठी सून म्हणून मी खूप कमी पडले आहे. तर होणाऱ्या सूनेकडून मी काय अपेक्षा करु?”

आणखी वाचा – Video : सुनील शेट्टी यांनी स्टेजवरच भारती सिंहला केलं किस, मिठीही मारली अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “फक्त मी तिला एवढच सांगेन की, तू तुझ्या नवऱ्याची म्हणजेच माझ्या लेकाची चांगली काळजी घे. बाकी माझी तशी काही इच्छा नाही. मुळात असं असतं की, एका विशिष्ट काळानंतर, आपल्या घरातील सगळा कारभार आपण आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवला पाहिजे, त्यामुळे आपल्या डोक्याला त्रास कमी होतो. तर मी ही तेच करणार आहे. याशिवाय तिचं आणि माझं नातं चांगलं होण्यासाठी जे काही करता येईल ते मी निश्चित करेन.”  ]

आणखी वाचा – रामनवमीला राशीनुसार करा ‘या’ मंत्राचा जप, अशाप्रकारे करा श्रीराम यांची पूजा, तुम्हाला आयुष्यामध्ये जाणवतील सकारात्मक बदल

दरम्यान, ‘फु बाई फु’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा अनेक विनोदी कार्यक्रमातून विशाखा सुभेदार यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांतदेखील काही भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय आता त्या स्टार प्रवाहवरील ‘शुभविवाह’ मालिकेतील रागिणी या भूमिकेतून खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.      

.

Tags: marathi actressmarathi entertainment newsVishakha Shubhedar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Paaru Serial Update

अहिल्यादेवी किर्लोस्कर पारूच्या डोक्यावर ठेवणार मायेचा पदर, प्रीतमच्या मैत्रीचं आदित्यला कौतुक, मालिकेत येणार रंजक वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.