हिवाळा ऋतु संपून आता उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं असतं आणि हायड्रेशनसाठी कितीही अन्य उपाय केले तरी पाणी पिणं अत्यंत गरजेचं असतं. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात सर्वांनाच खूप तहान लागते. त्यामुळे सर्वांनाच थंड पाणी प्यावेसे वाटते. विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती उन्हातून घरी येते. तेव्हा अनेकजण फ्रीजचे थंड पाणी पितात. पण तुम्हाला माहित आहे का फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने तुमच्यावर आरोग्यावर घातक परिणाम होतात. चला तर जाणून घेऊयात या परिणामांबद्दल…
उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने शरीरात थंडपणा जाणवतो. पण फ्रीजमधलं थंड पाणी पिणं हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. थंड पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्यांमध्ये वासोस्पॅझम नावाची आजाराला आमंत्रण देणारी स्थिती उद्भवण्याची भीती असते. फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने आपल्याला घश्याबरोबरच हृदयाचे सुद्धा आजार उद्भवू शकतात.

खूप थंड पाणी प्यायल्याने रक्ताभिसरणात अडथळा येतो आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात. थंड पाण्यामुळे शरीराला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. जर तुम्ही रोज थंड पाणी प्यायले तर त्याचा तुमच्या पचनावरही नकारात्मक परिणाम होतो आणि पोट फुगणे व गॅसशी संबंधित समस्या उद्भवतात. थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवणे व खोकला होतो. याशिवाय सांधे दुखतात आणि जडपणा येतो.
यावर उपाय म्हणून शरीराच्या तापमानात समतोल राखण्यासाठी साधे पाणी प्यायला हवे. यावर अगदीच सोयीचा पर्याय म्हणजे माठातील थंड पाणी पिणे अगदीच सोयीचे आहे. त्याचबरोबर शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी यासारखी पेये पिऊ शकता. तसेच तापलेल्या वातावरणातून घरी आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नका निदान १० ते १५ मिनिटे शरीर घरातील तापमानात स्थिर होऊद्या मग थंड पाणी प्या.