‘टाईमपास’ चित्रपटातून अभिनेता प्रथमेश परब घराघरांत पोहोचला. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश विशेष चर्चेत आला होता. प्रथमेश त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला. प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नसोहळ्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. क्षितिजा व प्रथमेश बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. २४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश व क्षितिजा यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. प्रथमेश व क्षितिजा यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. (prathamesh parab wife post)
लग्नानंतर प्रथमेशची बायको सासरी रमलेली दिसली. लग्नानंतर ही प्रथमेश व क्षितिजा त्यांच्या संसारात रमलेले दिसले. लग्नानंतर प्रथमेशच्या पत्नीचा पहिला वाढदिवस तिच्या सासरच्या घरी साजरा करण्यात आला. यावेळी तिच्या सासूबाईंनी औक्षणही केलेलं पाहायला मिळालं. इतकंच नव्हेतर रात्री केक कट करुन तिला सरप्राइज गिफ्टही दिलं. लग्नानंतर लगेचच प्रथमेशच्या बायकोने कामाला सुरुवात केली. सोशल मीडियावर क्षितिजा बऱ्यापैकी सक्रिय असते.

सोशल मीडियावरुन नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. बरेचदा क्षितिजा तिच्या ऑफिसमधले फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते. अशातच क्षितिजाने शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्षितिजाने सासूबाईंकडून होणाऱ्या लाडाबद्दल ही पोस्ट केली आहे. “जेव्हा तुम्ही ऑफिसमधून खूप थकून भागून घरी येता. आणि आल्या आल्या तुमच्यासाठी तुमच्या आवडीची पाणीपुरी बनवलेली असते. सासूबाईंच्या हातचं”, असं म्हणत तिने खास पाणीपुरीच्या बेताचा हा फोटो कॅप्शनसह पोस्ट केला आहे.
परबांच्या घरी क्षितिजाचे बरेच लाड होताना दिसत आहेत. क्षितिजा सामाजिक कार्य करणाऱ्या एनजीओमध्ये सध्या काम करत आहे. काहीतरी सामाजिक कार्य केलं पाहिजे ही तळमळ क्षितिजा एनजीओमार्फत पूर्ण करताना दिसत आहे. याशिवाय एक फॅशन मॉडेल म्हणूनही तिने काम केले आहे. क्षितिजा एनजीओमध्ये काम करतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन पोस्ट करतानाही दिसते.